Abhi and Niyu : सोशल मीडियावरुन विविध विषय घेऊन सध्या अनेकजण पुढे येत आहेत. याच कॉन्टेट क्रिएटर्सचा पंतप्रधान मोदींनी (PM Modi) देखील सन्मान केला होता. त्यातील युट्युबर अभि आणि नियू (Abhi And Niyu) तुम्हाला माहित असतीलच. तोच अभि एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा आहे आणि नियू ही त्यांची सून आहे. अभि आणि नियू हे दोघेही अनेक विषय घेऊन पुढे आले आहेत. अनेक महत्त्वपूर्ण विषयावर अभि आणि नियू या दोघांनीही व्हिडिओ केले आहेत. त्यांचे हे व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरतात.
सध्या सोशल मीडिया हे माध्यमांइतकच डिजिटल असणारं प्रभावी माध्यम म्हणून पुढं आले आहेत. त्यातून अभि आणि नियू ही जोडी पुढे आलीत. गेली अनेक वर्ष हे दोघेही खूप चांगला कॉन्टेट पुरवत आहेत. नुकतच त्यांचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देखील सन्मान करण्यात आला आहे. अभि अँड नियू म्हणजेच अभिराज आणि नियती हे दोघं देशातील आघाडीच्या कॉन्टेट क्रिएटर्सपैकी एक आहेत. त्यांचे मिलियन्स फॉलोअर्स सध्या सोशल मीडियावर आहेत. अभि आणि नियू हे नवरा बायको आहेत. अभिराज राजाध्यक्ष असं त्याचं नाव असून तो लोकप्रिय अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष (Anuradha Rajadhyaksha) यांचा मुलगा आहेत. तसेच नियती राजाध्यक्ष ही त्यांची सून आहे.
अनुराधा राजाध्यक्ष सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री
अनुराधा राजाध्यक्ष या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यानी अनेक लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकलीत. नुकतच अनुराधा यांनी अभि आणि नियूचा पंतप्रधान मोदी यांनी सन्मान केल्यानंतर एक फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यांनी दोघांचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्या फोटोलो दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं की, “आई म्हणून आज तुम्हा दोघांचाही खूप खूप अभिमान वाटतोय. अभिमानास्पद कामगिरी…लव्ह यू अभिराज आणि नियती” अनुराधा या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात.