aashram actress aditi pohankar : अभिनेता बॉबी देओल आणि अभिनेत्री आदिती पोहनकर यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत असलेली आश्रम ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुफान गाजली. या वेब सिरीजमध्ये बॉबी देओल एका बाबाच्या भूमिकेत तर आदिती पोहनकर एका पैलवानाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. या सिरीजमध्ये आदिती आणि बॉबी देओलचे अनेक इंटीमेट सीन पाहायला मिळाले होते. दरम्यान, हे इंटीमेट सीन शूट करताना कोणत्या अडचणी आल्या? याबाबत आदिती पोहनकरने भाष्य केलंय. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आदिती पोहनकर म्हणाली, इंटिमेंट सीन करणे कठीण असते, अवघड असते. कारण दोन्ही कलाकरांना नॉर्मलपणे ते साकारणे गरजेचं असतं. मला इम्तियाज सरांनी सांगितलं होती की, पुरुष नेहमी अशा सीनमध्ये उत्साही असतात. त्यामुळे अॅक्टरची काळजी घेणे गरजेचे आहे. 

एकमेकांमध्ये संवाद असेल तर सर्वकाही व्यवस्थित होतं. काय झालं? तुम्ही व्यवस्थित आहात? अशी चौकशी केली तर सर्वांना सुरक्षित वाटतं. अशाच प्रकारे मी आश्रममध्ये सीन केले होते. आश्रमच्या शुटींगवेळी आमचं नातं मजबूत होतं. जर कोणता सीन व्यवस्थित शूट होत नसेल तर आणि त्यामध्ये कट असेल तर आम्ही शूटची जागा बदलत असायचो. त्यामुळे आम्ही अधून मधून एकमेकांची चौकशी देखील करायचो. बॉबी देओलसोबत इंटीमेंट सीन शूट करताना दोघांमध्ये वेगळी सिच्युशन निर्माण झाली होती. 

मी बॉबी देओल यांचं सगळं जेवण संपवून टाकलं, त्यामुळे ते माझ्यावर चिडले होते. तेव्हा आमच्यातील सिच्युशन नॉर्मल झाली. ते म्हणाले, माझा लिठ्ठी चोखा खाऊन टाकला का? मी म्हणाले हो खाऊन टाकला. मात्र, त्यामुळे मी नंतर त्यांच्याशी खास डिश आणली होती. मात्र, ती त्यांना खाता आली नाही. कारण ते जास्त मसाला असलेले पदार्थ खात नाहीत. त्यामुळे तेही मीच खाऊन टाकलं. एवढं सगळं घडल्यानंतर आमच्यातील अंतर कमी झालं.  

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashwini Kulkarni on Marathi Movie: 'प्रत्येक वेळी सईसारखी बिकिनी घालणं गरजेचं नाही...'; मराठमोळ्या अभिनेत्रीचं परखड मत, स्त्रियांच्या सादरीकरणाबाबत म्हणाली...