रायगड: उलवे येथे एका कॅब चालकाची हातोड्याने हल्ला करत डोळे फोडल्याने आणि डोक्यावरतीही होतोड्याने वार करून निर्घृणपणे हत्या केली होती (Crime News). या घटनेत आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली होती. याप्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. कॅब चालकाच्या हत्येनंतर (Crime News) दोघेही कॅब घेऊन पुणे, नाशिकला गेल्यानंतर तेथे त्यांच्या हातून घडलेल्या अपघातांमुळे या खुनाचा (Crime News) उलगडा झाला होता. मात्र, आता या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिनाभर ज्याच्यासोबत एकाच घरात राहिली, त्याचीच हत्या करून तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळ काढला. हत्येनंतर त्याची कॅब आणि फोन घेऊन पसार झाले, तीन दिवसांनी त्यांच्याकडून पुण्यात आणि नाशिकमध्ये झालेल्या अपघातामुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला. इन्स्टाग्रामवरील जुळलेल्या प्रियकरासोबतच्या तिच्या रासलीला मोबाइलमध्ये रेकॉर्ड केल्याने दोघांनी मिळून त्याची हत्या केली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उलवेतील मोहोळ गावात राहणाऱ्या आणि कॅबचालक असलेल्या संजय पांडे (वय 44) याचा त्याच्याच घरात पडलेला मृतदेह पोलिसांना तीन दिवसांनी सापडला होता. कॅबवर चालकाचे काम करणारा संजय अविवाहित होता, काही महिन्यांपूर्वी त्याच्या कॅबमधून मूळच्या हरयाणाच्या रिया सरकन्यासिंग (वय 19) हिने प्रवास केला होता. यादरम्यान तिने आपण नोकरीच्या शोधात असून, निराश्रित असल्याचे संजयला सांगितलं. त्यानंतर संजयने तिला पनवेलमध्ये नोकरी मिळवून देऊन तिला स्वतःच्याच घरात तिला आश्रय दिला होता. तेव्हापासून ती देखील संजयसोबत त्याच्या मोहोळ गावातील घरात राहात होती.

रासलीलाचे व्हिडिओ संजयने मोबाइलमध्ये रेकॉर्ड

यादरम्यानच तिची इन्स्टाग्रामवरून नाशिकच्या विशाल शिंदे (21) याच्यासोबत ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते, त्यानंतर ती नुकतीच नाशिकला गेली होती. परंतु, तिने पुन्हा एकदा आपल्याकडे राहायला यावे, असा संजय पांडे (वय 44) याचा आग्रह होता. यातून तो नाशिकला जाऊन 31 मार्चला दोघांनाही सोबत घेऊन आला होता. 1 एप्रिलच्या रात्री संजयच्या घरात त्या दोघांच्या रासलीलाचे व्हिडिओ संजयने मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले होते. यावरून तो आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता, असा तिचा आरोप आहे.

कसे सापडले दोघे आरोपी?

दोघांनी मिळून संजय पांडे (वय 44) हातोडीचे घाव घालून हत्या करून पळ काढला होता. यावेळी त्यांनी त्याचा मोबाइल व कॅब देखील सोबत नेली होती. परंतु, कार चालवता येत नसल्याने दोन दिवसांनी विशालकडून पुण्यात एक अपघात झाला. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांच्या कारवरील नंबरवरून गाडी मालकाला संपर्क साधून त्याचा फोटो पाठवला. यावेळी तो संजय नसून दुसराच कोणीतरी असल्याचे कॅब मालकाच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी याबाबत संजयच्या भावाला कळवलं आणि उलवे पोलिसांकडे संजय पांडे (वय 44) बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यामध्ये त्याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता त्याचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर त्या दोघांनी नाशिकमध्ये स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती आहे.