Janhvi Kapoor Shares Shikhar Pahariya Post On Marathi Hindi Language: महाराष्ट्रात (Maharashtra News) मराठी-हिंदी भाषेचा (Marathi Hindi Language Row) वाद सुरू आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण (Maharashtra Politicle Updates) लागलं आहे. दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Actress Janhvi Kapoor) बॉयफ्रेंड आणि प्रसिद्ध बिझनेसमन शिखर पहाडियानं (Shikhar Pahariya) या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिखर पहाडिया म्हणजे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू. त्यानं इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर करुन आपलं मत व्यक्त केलं आहे. शिखरनं पोस्टमध्ये म्हटलंय की, "मराठी हे हत्यार बनवू नका, त्यापेक्षा भाषेचा उत्सव साजरा करून त्याचे रक्षण करूया... अभिमान प्रेमात रुजू द्या, भीतीत नाही. आपण एकत्र उभे आहोत."

Continues below advertisement

सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाला शिखर पहाडिया? 

"आपली मराठी अस्मिता धमकावून नव्हे, तर सर्वांच्या समावेशातून चमकू द्या. मराठी हे हत्यार बनवू नका, त्यापेक्षा भाषेचा उत्सव साजरा करून त्याचे रक्षण करूया. अस्मिता ही स्वतःची ओळख उंचावणारी भावना असावी, कुणाच्यातही फूट पाडणारी नसावी. आपण भारतात कुठल्याही भागात राहत असलो किंवा आपण कोणतीही भाषा बोलत असलो तरी अस्मिता ही आपल्याला अभिमान देते, कोणताही पूर्वग्रह दुषित विचार देत नाही. मराठी अस्मिता खरी आहे. ती भावनिक स्तरावर आणि आपल्या जीवनशैलीत खोलवर रुजलेली आहे...", असं शिखर पहाडियानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे बोलताना शिखर पहाडिया म्हणाला की, "सोलापूरमधील एक व्यक्ती म्हणून, मला ही बाब निश्चित समजते. प्रत्येक भाषा आपल्याला घडवते, राज्यांना आकार देते, आपल्याला कवितांपासून ते क्रांतीची प्रेरणा देते. मराठीही त्याला अपवाद नाही. आपण सर्व भाषांप्रमाणेच मराठीही जपली पाहिजे, संरक्षित केली पाहिजे आणि पुढे नेली पाहिजे. पण तो अभिमान इतरांच्या प्रतिष्ठेला धक्का लावून मिळवलेला असू शकत नाही. जे प्रामाणिकपणे कष्टाने जगत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लावता कामा नये. सोलापूरचे बरेच लोक कठोर परिश्रम करण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी दिल्ली, चेन्नई किंवा कोलकाता येथे प्रवास करतात. कल्पना करा की, जर त्यांना तिथे या भाषेसाठी अपमानित केले गेले तर, तेव्हा आपण काय करायचे?"

Continues below advertisement

"जेव्हा लोक संघर्ष करत असतात आणि कठोर परिश्रम करत असतात, त्यांच्या कुटुंबांपासून दूर असतात, तेव्हा हिंसक कृतीद्वारे अशा गोष्टी लादणे स्वीकारारण्यासारखे नाही. मुंबईत लोक हिंदी, तमिळ किंवा गुजराती बोलतात ही शोकांतिका नाही. खरी शोकांतिका म्हणजे, मराठीला धोका आहे असे मानणे. भीती दाखवून आपण एखादी भाषा जिवंत ठेवू शकत नाही. मुंबई, महाराष्ट्र आणि भारत हे त्या सर्वांचे आहे, जे सन्मानाने जगतात, प्रामाणिकपणे काम करतात आणि स्वाभिमानाने बोलतात, मग त्यांची भाषा कोणतीही असो...", असं शिखर पहाडिया म्हणाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jaywant Wadkar On Swami Samarth Darshan Experience Akkalkot: 'पत्नी नऊ महिन्यांची गरोदर, अक्कलकोटला निघालेलो अन् गाडीचा ब्रेक फेल झाला...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला समर्थांच्या कृपेचा किस्सा