Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गाचा आलेख घटताना पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 3157 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 19 हजार 500 वर पोहोचली आहे. तर रविवारी दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 3324 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 40 जणांचा मृत्यू झाला. देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे जाणून घ्या.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 500
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 500 इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 2723 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 38 हजार 976 जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 50 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 843 झाली आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. रविवारी दिवसभरात देशात 2 लाख 95 हजार 588 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.


आतापर्यंत 189 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 189 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. रविवारी दिवसभरात 4 लाख 2 हजार 170 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत 189 कोटी 23 लाख 98 हजार 347 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.







 


महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबळी
मिळालेल्या आकडेवारीनुसार, कोकोनामुळे देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 23 हजार 843 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 1 लाख 47 हजार 843 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह केरळमध्ये 69 हजार 47, कर्नाटकमध्ये 40 हजार 101, तामिळनाडूमध्ये 38 हजार 25, दिल्लीत 26 हजार 175, उत्तर प्रदेशमध्ये 23 हजार 507 आणि पश्चिम बंगालमध्ये 21 हजार 201 लोकांचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक रुग्ण इतर आजारांनीही ग्रस्त होते.


महत्त्वाच्या बातम्या