Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मध्ये पुन्हा होणार शेखरची एण्ट्री, संजनाला बसणार मोठा धक्का!

Aai Kuthe Kay Karte : संजना आणि अनिरुद्धचं लग्न झाल्यापासून मालिकेत संजनाचा माझी पती अर्थात शेखर दिसलाच नव्हता.

Continues below advertisement

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत बऱ्याच दिवसांनी शेखरची एण्ट्री होणार आहे. संजना आणि अनिरुद्धचं लग्न झाल्यापासून मालिकेत संजनाचा माझी पती अर्थात शेखर दिसलाच नव्हता. आता त्याचं मालिकेत पुरागमन झालं आहे. शेखरच्या परत येण्याने मालिकेत आता एक नवी धमाल पाहायला मिळणार आहे. मात्र, त्याला पाहून आता संजना आणि अनिरुद्धची पाचावर धारण होणार आहे.

Continues below advertisement

सध्या मालिकेत अनिरुद्ध आणि संजनाच्या आयुष्यात अनेक बदल घडताना दिसत आहेत. कधीकाळी यशाच्या शिखरावर असलेले अनिरुद्ध आणि संजना आता कामच्या शोधात भटकत आहेत. तर, नवऱ्याला न विचारता जागची वस्तू देखील न हलवणारी अरुंधती आता स्वतःच्या पायावर उभं राहून स्वप्नांना गवसणी घालत आहे.

शेखरच्या येण्याने देशमुखांच्या घरात उडणार गोंधळ!

इतके दिवस सगळ्यांपासून लांब असलेला शेखर आता देशमुखांच्या घरात परतला आहे. त्याच्या येण्याने पुन्हा एकदा संजना आणि अनिरुद्धच्या आयुष्यात गोंधळ उडणार आहे. मात्र, शेखरच्या येण्याने अरुंधतीला एक नवी साथ मिळणार आहे. आल्या आल्या शेखरने संजनाला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. आपण इथे का आलो याचं कारण सांगताना शेखर म्हणतो की, मी माझ्या वहीत थोर लोकांच्या सह्या घ्यायला आलो आहे आणि अरुंधती वहिनी तर सगळ्यात थोर आहेत.

दुसरीकडे, शेखर अरुंधतीला तिच्या म्युझिक अल्बम लाँचच्या कामामध्ये मदत करताना दिसणार आहे. त्याच्या येण्याने अरुंधती आणि यशला प्रचंड आनंद होणार आहे. लवकरच अरुंधतीचा पहिलावहिला म्युझिक अल्बम लाँच होणार आहे. यातून अरुंधती तिच्या स्वप्नाला सत्यात उतरवणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola