Grapes :  तुम्ही अनेकदा काळी (Black Grapes) आणि हिरवी द्राक्ष (Green Grapes) खाल्ली असतील. ही दोन्ही द्राक्षे आरोग्यासाठी आणि चवीलाही चांगली आहेत. काळी द्राक्षे पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी चे चांगले स्त्रोत आहेत. तर दुसरीकडे, या द्राक्षांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. पण या दोन्ही द्राक्षांपैकी कोणती द्राक्षे जास्त फायदेशीर आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


काळ्या द्राक्षांचे फायदे :


१) काळी द्राक्षे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते.


२) काळ्या द्राक्षात पोटॅशियम असते, त्यामुळे ते हृदयासाठीही फायदेशीर असतात.


३) मधुमेहींसाठीही काळी द्राक्ष फायदेशीर आहेत.


४) काळी द्राक्षे खाल्ल्याने शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी सहज जळून जाते.


५) काळी द्राक्षे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात.


6) काळ्या द्राक्षांत व्हिटॅमिन ई आढळते. जे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. तसेच यामुळे त्वचेत चमक येण्यास मदत होते.


हिरव्या द्राक्षांचे फायदे : 


१) हिरव्या द्राक्षांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.


२) हिरव्या द्राक्षांमध्ये फायटोकेमिकल्स असतात. याच्या सेवनाने मेंदूवरील वयाचा प्रभाव कमी होतो.


3) हिरव्या द्राक्षांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते.


४) हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.


काळ्या आणि हिरव्या द्राक्षांमध्ये कोणती द्राक्षे फायदेशीर आहेत?


खरंतर, हिरवी आणि काळी द्राक्षे दोन्ही आरोग्यासाठी खूप चांगली आहेत. म्हणूनच तुम्ही दोन्ही द्राक्षांचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारू शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha