Vivek Agnihotri Pallavi Joshi love story : सध्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केले आहे.  चित्रपटामध्ये अभिनेत्री पल्लवी जोशीने (Pallavi Joshi) प्रमुख भूमिका साकारली आहे. विवेक आणि पल्लवी या दोघांनी 1997 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. जाणून घेऊयात पल्लवी आणि विवेक यांच्या लव्ह स्टोरीबाबत...


विवेक आणि पल्लवी यांची पहिली भेट ही एका रॉक कॉन्सर्टमध्ये झाली. त्यावेळी पल्लवीला विवेक हे अहंकारी वाटले होते. एका मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले, '90 च्या दशकात आम्ही एका   कॉन्सर्टमध्ये भेटलो. तेव्हा मी पल्लवीला ओळखत नव्हतो. आम्हाला दोघांनाही कंटाळा आला होता' पल्लवीनं सांगितलं, 'तेव्हा मला तहान लागली होती आणि विवेकनं मला पाणी दिलं.' काही प्रोजेक्टमध्ये दोघांनी एकत्र काम केले. त्यानंतर तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 28 जून 1997 रोजी लग्नगाठ बांधली.  
 
द कश्मीर फाइल्सचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ 
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने 11 दिवसांत एकूण 179 कोटींहून अधिक कमाई बॉक्श ऑफिसवर केली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि पुनीत  यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha