Khaleesi denied passport : एका सहा वर्षीय ब्रिटिश मुलीचं डिस्नीलँडला (DisneyLand) जायचं स्वप्न भंगलं आहे. कारण तिचा हा प्रवास केवळ तिच्या नावामुळे थेट नाकारण्यात आल्याची घटना युकेमध्ये घडली आहे. कारण या मुलीचं 'गेम ऑफ थ्रोन्स'मधील (Game of Thrones) एका प्रसिद्ध पात्राचे नाव तिचे ठेवल्याने हा सगळा गोंधळ झाला आहे.
खलीसी असं या चिमुकलीचं नाव असून तिच्या आईने याविषयी माहिती दिली आहे. या मुलीचं नावही खलीसी असं आहे. दरम्यान खलीसी या नावाचे ट्रेडमार्क्स हे फक्त वॉर्नर ब्रदर्सकडे आहेत. त्यामुळे ट्रेडमार्क मालकांच्या ना हरकतीसाठी पासपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मुलीच्या आईला दिली आहे.
ट्रीप प्लॅक केली असतानाच पासपोर्ट ऑफिसकडून आलं लेटर
दरम्यान डिस्नीलँडची ट्रीप प्लॅन केली असतानाच या कुटुंबाला पासपोर्ट कार्यालयाकडून हे लेटर देण्यात आलं. त्यामध्ये पासपोर्टवर खलीसी हे नाव वापरण्यासाठी ट्रेडमार्क जायंची परवानगी आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी तिच्या डिस्नीलँडच्या ट्रीपसाठी जवळपास 2,000 युरो म्हणजेच जवळपास 1,83,000 भारतीय रुपये इतकी किंमत मोजली होती.
'तरीही वॉर्नर ब्रदर्सच्या पत्राचा आग्रह...'
मुलीच्या आईने या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ही आमची पहिलीच ट्रीप होती. ज्यामध्ये आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आणि ट्रेडमार्क वैयक्तिक नावांपर्यंत विस्तारत नसल्याचा पुरावा देऊनही, पासपोर्ट कार्यालयाने सुरुवातीला वॉर्नर ब्रदर्सच्या पत्राचा आग्रह धरला. पण त्यानंतर मुलीच्या आईने सोशल मीडियावर या सगळ्यावर भाष्य केलं आणि या प्रकरणाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शेवटी पासपोर्ट कार्यालयाकडून त्यांची चूक मान्य करण्यात आली. पण आता पासपोर्ट येईपर्यंत त्यांच्या या ट्रीपला मात्र अजूनही ब्रेक लागल्याचं मुलीच्या आईकडून सांगण्यात आलं आहे.