Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनचा (Bigg Boss Marathi New Season) दुसरा आठवडा सुरू झाला आहे. 'बिग बॉस'च्या घरात पहिल्या आठवड्यात शांत असणारे सदस्य आता आपला खेळ उंचावण्यासाठी आणि घरातील चर्चेत पुरेपुर प्रयत्न करणार आहेत. घरातील दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही वादावादीने होणार असल्याचे चित्र आहे. बिग बॉसच्या घरात अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेने (Paddy Kamble) छोटा पुढारी घन:श्याम दरोडे (Ghanshyam Darode) याची लाजच काढली आहे.
बिग बॉस मराठीतून पहिल्या आठवड्यात किर्तनकार पुरुषोत्तम पाटील घराबाहेर पडले आहेत. त्यानंतर आता इतर 15 सदस्य घरात आपले वजन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. दुसऱ्या आठवड्यात घरात काही घडामोडी होणार आहेत. ‘बिग बॉस’मध्ये पॅडी व घन:श्याम यांच्यातही भांडण होत असल्याचे पाहायला मिळणार आहे.
काय झालं नेमकं?
नवीन प्रोमोनुसार, पॅडी घन:श्यामला बोलतात की, “तुला लाज नाही वाटत?, ‘बिग बॉस’ आपल्याविरुद्ध बोलत आहेत. यावर घन:श्याम पॅडीला असं म्हणतो की, “मला कशाची लाज वाटणार. ‘बिग बॉस’ बोलले त्यावरुन हे सिद्ध होते की, मी झोपलो नव्हतो”. यानंतर तो रागात “माझी लाज काढू नका” असेही घन:श्याम म्हणतो. त्यावर पॅडी पुन्हा एकदा असं म्हणतात की, “बिग बॉस आपल्याला सुनावत आहेत आणि तू त्यांच्यासमोर (आव्हान दिल्यासारखे) हातावर थाप मारत आहेस”. यावर घन:श्याम पॅडीला “ठीक आहे सॉरी. पण तुम्ही लाज काढू नका” असे म्हणतो.
घन:श्यामची पॅडीवर चिडचिड...
प्रोमोवरून हा प्रकार दुपारच्या वेळी घरात झोपल्यामुळे झाले असल्याचा अंदाज आहे.पॅडी घन:श्यामला बोलताना सांगतात की “तुला काहीतरी वाटलं पाहिजे” असं म्हण ते घन:श्यामला “येडया येडया” असं बोलतात.
पॅडीने चिडवल्यानंतर ‘बिग बॉस’ घन:श्यामला असं म्हणतात की, “आपण जरी झोपला नसलात तरी कोण झोपलं आहे. याच्याकडे आपले डोळे उघडे पाहिजे” त्यानंतर घन:श्याम पॅडीला पुन्हा “याआधी एखाद्याची लाज काढण्याआधी ध्यानात ठेवा” असे छोटा पुढारी म्हणतो.
निक्की-अरबाजमध्येही वादाचे फटाके
निक्की अरबाजला समजावत असताना अरबाजचा आवाज वाढतो, त्यावेळी निक्की त्याच्यावर चांगलीच भडकते. त्यामुळे या दोघांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडते. दरम्यान घन:श्याम, जान्हवी आणि वैभव या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच आता ज्यांची मैत्री जुळली होती, त्यांच्यातही आता वादाला तोंड फुटलं आहे.