Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका सध्या बऱ्याच रंजक वळणावर आहे. मिहिकाने हर्षवर्धनसोबत लग्न केल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यातच सावनी या सगळ्यासाठी पुन्हा एकदा मुक्तालाच दोष देते. पण या सगळ्यात आदित्यची मात्र फरफट होत असल्याचं पाहायला मिळतंय. मिहिकाला असं वागायला मुक्तानेच प्रवृत्त केलं असल्याचं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्यासाठी मुक्ताच जबाबदार असल्याचं सावनी मत आहेत. 


या सगळ्यात हर्षवर्धन सावनीचे सगळे कार्ड्स ब्लॉक करतो आणि तिला पैसे देणंही बंद करतो. त्यामुळे सावनीकडे हॉटेलचं बिल पे करायलाही पैसे नव्हते. त्यामुळे ती आदित्यसोबत राहत असलेल्या हॉटेलमधूनही तिला हकलून दिलं. दारुच्या नशेत सावनी आदित्यला घेऊन बाहेर पडली पण ती रस्त्यातच बसली. त्यावेळी आदित्य सागरला फोन करतो पण तो फोन मुक्ता उचलते आणि ती सावनीला आणायला जाते.                                                                


मुक्ताने सावनीला आणलं घरी


दारुच्या नशेत असलेल्या सावनीला मुक्ता घरी घेऊन येते. जेव्हा ती रस्त्यावर सावनीला पाहते, त्यावेळी आदित्य तिला म्हणतो की, आमचं घरच नाही. त्यावर मु्क्ता भावनिक होते आणि त्याला म्हणते की, तुझं घरही आणि कुटुंबही. त्यामुळे मुक्ता आदित्यसाठी सावनीला घरी घेऊन येते. सावनीला घरी बघून सगळ्यांना पुन्हा मोठा धक्का बसतो.


सावनीला घरात ठेवण्यासाठी इंद्राचा विरोध


दरम्यान सावनीला घरात ठेवण्यासाठी इंद्रा विरोध करते. पण त्यावर मुक्ता आदित्यसाठी सावनीला घरात ठेवण्याची प्रत्येकाला विनंती करते. पण तरीही सावनीला घरात ठेवण्यासाठी कुणीच तयार नसतं. पण दुसऱ्या दिवशी सावनी म्हणते की आदित्यला घेऊन चाळीत राहायला जाणार आहे. त्यावर आदित्यसाठी सगळ्यांनाच धक्का बसतो. 


सावनीचं नवं षडयंत्र


सावनी चाळीत राहायला जाणार असं सांगते तेव्हा सागरही तिला घरात राहण्यासाठी परवानी देतो. त्यावेळी ती म्हणते पण माझी त्यासाठी एक अट असेल, मी घरात असेपर्यंत मुक्ताने माझ्याशी नीट वागायचं. त्यावर मुक्ता म्हणते की, ज्या दिवशी या घरासाठी कोणतीही अडचण निर्माण करशील त्या दिवशी मी माझ्या कोणत्याही मर्यादा सांभाळणार नाही. 


ही बातमी वाचा : 


Purushottam Maharaj Patil : घरातले टॉप तीन स्पर्धक कोण? पहिल्याच आठवड्यात एलिमिनेट झालेल्या पुरुषोत्तम दादांनी केली स्पर्धकांची पोलखोल