Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अतिशय फिटनेस फ्रीक आहे. टायगर श्रॉफला डान्सची जितकी आवड आहे, तितकाच तो फिटनेसबद्दलही उत्कट आहे. अनेकदा तो त्याचे वर्कआउट व्हिडीओ शेअर करत असतो. ज्यामध्ये त्याची फिटनेसची आवड स्पष्टपणे दिसून येते. पण, नुकताच 7 वर्षांच्या चिमुकल्या सानवी नेगी पाहून टायगरला चांगलाच घाम फुटला. सानवीने ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स 5’च्या मंचावर एका टास्कमध्ये टायगरचा पराभव केला.
टायगर श्रॉफ त्याच्या ‘हिरोपंती 2’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचला होता. येथे त्याची भेट सानवी नेगीशी झाली. सानवी ही या शोची स्पर्धक आहे, तिने टायगरला बॅकफ्लिप करण्याचे आव्हान दिले होते. त्याच वेळी टायगरने ते आव्हान स्वीकारले, पण तो चिमुकल्या सानवीकडून हरला. सानवी नेगीने 33 सेकंदात 52 बॅकफ्लिप केल्या. यासह सानवीने सर्वात वेगाने बॅकफ्लिप मारण्याचा विश्वविक्रमही केला.
टायगरने केले सानवीचे कौतुक!
टायगर श्रॉफही सानवीची अशी प्रतिभा पाहून चिमुकलीचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सानवीला बॅकफ्लिप करताना पाहून टायगर रोमांचित झाला. त्याच्या मते, बॅकफ्लिप्स करण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास येण्यासाठी खूप सराव करावा लागतो आणि या लहान वयात तिने आधीच एक विक्रम केला आहे. मी तिच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला, पण माझा पराभव मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. जय भानुशाली हा शो होस्ट करत आहेत, तर रेमो डिसूझा आणि सोनाली बेंद्रे या शोला जज करत आहेत.
हेही वाचा :