2020 Biggest Disaster Movie​: दररोज म्हटलं तरी बॉक्स ऑफिसवर (Box Office) अनेक चित्रपट रिलीज होत असतात. त्यापैकी काही हिट होतात, तर काही चित्रपट जोरदार आदळतात. पण, आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या डिझास्टर फिल्मबाबत सांगणार आहोत. हा चित्रपट आजवर रिलीज झालेला नाही, पण ट्रेलर मात्र रिलीज करण्यात आला होता. पण, प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. 


आजवरच्या सर्वात मोठ्या डिजास्टर फिल्म्सपैकी एक... 


दरवर्षी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. यापैकी काही चित्रपट मोठे हिट ठरतात, तर काही फ्लॉप देखील होतात, पण तुम्ही कधी अशा चित्रपटाबाबत ऐकलं आहे का? जो रिलीज होण्यापूर्वीच मोठा फ्लॉप ठरला, जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. असा चित्रपट जो कधीही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही. कारण या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रदर्शित होण्यापूर्वीच नाकारलं.


4 वर्षांपूर्वी होणार होता रिलीज


आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो 4 वर्षांपूर्वी म्हणजेच, 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. ज्याचा ट्रेलर देखील रिलीज झाला होता, पण हा चित्रपट कधीच थिएटरमध्ये रिलीज होऊ शकला नाही. रिलीज होण्यापूर्वीच फक्त ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यास नकार दिला होता. यामागे अनेक कारणे होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो अनेक वादात अडकला होता, ज्यामुळे निर्माते तो थिएटरमध्ये रिलीज करू शकले नाहीत. आणि त्याच वर्षी नंतर तो ओटीटीवर प्रदर्शित झाला, पण तिथेही प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारलं.


रिलीज होण्यापूर्वीच ठरला मोठा डिजास्टर


आजवरच्या सर्वात मोठ्या डिजास्टर मूव्ही म्हणजे, पूजा भट्ट आणि संजय दत्त यांच्या 1991 मधल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'सडक' चा सिक्वेल 'सडक 2'. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केलं आहे. हा चित्रपट फॉक्स स्टार स्टुडिओ आणि मुकेश भट्ट यांनी त्यांच्या बॅनरखाली बनवण्यात आला होता. या चित्रपटात संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होते. याशिवाय पूजा भट्टनंही चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. या चित्रपटातील सर्वात मोठा वाद सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित होता, ज्यामुळे लोक खूप संतापले होते.


चित्रपट बिग बजेट, पण तो रिलीज झालाच नाही


याशिवाय, त्यावेळी रिया चक्रवर्तीसह महेश भट्ट यांचं नावही या वादाशी जोडलं गेलं होतं. या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला होता. एवढंच नाही तर, या चित्रपटाच्या ट्रेलरला 1 कोटींहून अधिक डिसलाईक्स मिळाले, जो एक मोठा विक्रम होता. पूजा भट्टनंही याबद्दल राग व्यक्त केला होता. या चित्रपटाच्या विकिपीडियानुसार, या चित्रपटाचं बजेट 40 कोटी होतं, पण चित्रपट ना थिएटरमध्ये पोहोचला आणि ना ओटीटीवर प्रतिसाद मिळाला, जो निर्मात्यांसाठी मोठा धक्का होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Survival Thriller Web Series: आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या OTT वर करतेय ट्रेंड