मुंबई : टोरेस गैरव्यवहार प्रकरणी अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासल सुरूवात केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक झालेल्या 2 हजारहून अधिक लोकांनी मुंबई पोलिसांशी संपर्क केला आहे. तर नागरिकांच्या चौकशीतून ३७ कोटींपर्यंतची फसवणूक आतापर्यंत समोर आलेली आहे.


या प्रकरणतील व्हिसलब्लोअर्स ज्याने हे प्रकरण उघडकीस आणलं त्यांनं फसवणूक करणाऱ्या युक्रेनच्या आरोपींनी 200 कोटीहून अधिकची रक्कम परदेशात वळवली आहे, असा दावा केलाय. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास आता ईडीकडून स्वंतत्र रित्या केला जाणार असून प्रत्येक आरोप ईडीकडूनही पडताळले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयरच्या आधारे ईडीनं ईसीआयआर जारी केला आहे. शिवाजी पार्क पोलिसांकडील तक्रारीत भाजी विक्रेत्यानं जवळपास 1.25 लाख गुंतवणूकदारांनी टोरेसमध्ये गुंतवणूक केल्याचा दावा केला होता.  


भाजी विक्रेत्याशी संबंधित 66 गुंतवणूकदारांनी 13.85 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुरुवातीला गुंतवणूकदारांना काही रक्कम मिळाल्यानंतर ती मिळणं बंद झालं होतं. या प्रकरणाचं गांभीर्य पाहून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. 


आर्थिक गुन्हे शाखेच्या तपसात हा घोटाळा यूक्रेनच्या नागरिकांनी रचलेला कट असल्याचं समोर आलं. या आरोपींनी निम्न मध्यमवर्गीय लोक 40000 ते  50000 रुपयांची गुंतवणूक करु शकतील, अशी योजना बनवली होती. 


आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या प्रकरणात सहभागी असलेले 10 विदेशी नागरिक फरार आहेत. त्यांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. काही जण घोटाळा उघड होण्यापूर्वीच देश सोडून पळून गेले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या मते या घोटाळ्याचा मास्टरमाईंड ओलेना स्टोइन आहे. 


आरोपींनी घोटाळा करताना पूर्णपणे योजना बनवली होती. त्यांच्या नियोजनानुसार ख्रिसमसदरम्यान देश सोडून पळून जायचं होतं. पळून गेलेल्या लोकांचा व्हिसा एका महिन्यापर्यंत संपणार आहे.  डिसेंबर 2024 पर्यंत घोटाळा करुन ख्रिसमसच्या काळात देश सोडून पळून जावा, ख्रिसमसच्या कारणावरुन देश सोडून बाहेर गेल्यास कुणाला संशय येणार नाही असं समजून त्यांनी त्यानुसार काम केलं.
 
आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार तानिया कसातोव्हा आणि रशियाची नागरिक वॅलेंटिना कुमारी यांना कोर्टानं ईओडब्ल्यूच्या कोठडीत पाठवलं आहे. दोन्ही आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. तानिया कसातोव्हाला 2018 मुंबईच्या सहार पोलिसांना मरियम खराखान गिजी नावाचा बोगस पासपोर्ट बाळगल्यानं अटक केलंहोतं.  


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत डोंगरी पोलिसांनी 62 लाख रुपये जप्त गेले होते तेव्हा कसातोव्हानं प्रकरण मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला होता. या प्रकरणी देखील इओडब्ल्यूकडून माहिती घेतली जात आहेत. आतापर्यंत 2 हजार तक्रारदास मोर आले आहेत. त्यांनी जवळपास 39 कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार दिलीय. आर्थिक गुन्हे शाखेनं 11 टोयोटा ग्लेंजा कारसह 21 कोटी रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. 


इतर बातम्या : 


Torres Scam : दादरचं ऑफिस 25 लाखात मिळवून दिलं, कंपनीनं दहावी नापासला तौसिफला CEO केलं, टोरेसचे धक्कादायक कारनामे