नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिक येथे सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्यावरुन सत्ताधारी भाजप-शिवसेनेला प्रश्न विचारले. "2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भाजप-शिवसेनेने 72 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला असल्याची बोंब मारली होती. या घोटाळ्यावरुन भाजपने सत्ताधाऱ्यांवर आणि प्रामुख्याने अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. जर या लोकांनी घोटाळा केला होता, तर सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने अजित पवार आणि सुनील तटकरेंवर कारवाई का केली नाही?" असा सवाल अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षाच्या सांगलीत आयोजित सभेत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी विचारले होते की, 72 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचं काय झालं? शाह यांच्या या विधानाचा राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले की, "सत्ताधारी तुम्ही आहात या घोटाळ्याचे पुढं काय झालं हे तुम्ही सांगा, आम्हाला काय विचारता. तुम्ही सत्तेत असून कोणावरही कारवाई का केली नाहीत, याची उत्तरं द्या."

UNCUT | नाशिकमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 'राज'बाण, पाहा संपूर्ण भाषण | एबीपी माझा



सिंचन घोटाळा झाला की नाही? हे सत्ताधाऱ्यांनी सांगावं, की भाजप-शिवसेनेने या घोटाळ्याचेळी राजकारण केलं का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.