Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. तर महाविकास आघाडीने 31 जागांवर यश मिळावले आहे. राज्यातील 48 खासदारांची नावे समोर आली आहेत. पण यामध्ये सर्वात श्रीमंत खासदार कोण? सर्वात तरुण खासदार कोण? याबाबत तुम्हाला माहितेय का ? 


राज्यातील सर्वात गरीब खासदार कोण ?


अहमदनगरचे निलेश लंके राज्यातील सर्वात गरीब खासदार आहेत. निवडणूक आयोगानुसार,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) खासदार निलेश लंके यांच्यांकडे 7.8 लाख रुपयांची संपत्ती आहे. निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव केला. 


सर्वात श्रीमंत खासदार खासदार कोण ?


भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे राज्यातील सर्वात श्रीमंत खासदार आहे. साताऱ्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचा 32 हजार मतांनी पराभव केला. उदयनराजे भोसले यांची संपत्ती तब्बल 223 कोटी रुपये इतकी आहे. 


उदयनराजे, त्यांच्या पत्नी, मुले व भोसले कुटुंबांची एकूण संपत्ती 296 कोटी 39 लाख 11 हजार 585 रुपये एवढी आहे. त्यामध्ये, उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे.उदयनराजेंची एकूण स्थावर आणि जंगम संपत्ती 1 अब्ज 90 कोटी 93 लाख 64 हजार 634 रुपये आहे. तर, त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती स्थावर आणि जंगम मालमत्ता 6 कोटी 89 लाख 47 हजार 201 रुपये एवढी आहे. उदयनराजेंकडे १ कोटी ९० लाख ५ हजार १६५ रुपये किमतीच्या अलिशान गाड्या आहेत. उदयनराजेंकडे १७२ कोटी ९४ लाख ४९ हजार ६९१ रुपये किमतीची शेतजमीन आहे. तर, पत्नीकडे ३ कोटी ७९ लाख ३७ हजार ५७० आणि मुलाच्या नावे ३ लाख १४ हजार ८२० रुपये किमतीची जमिन आहे. भोसले कुटुंबीयांकडे २८ कोटी ७९ लाख ४८ हजार ५६५ रुपये किंमतीची शेतजमीन असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे. उदयनराजेंकडे 30, 863 ग्रॅम सोनं चांदी, त्यांच्या पत्नीकडे 4750 ग्रॅम दागिने, कुटुंबाकडील सोने 628 ग्रॅम, तर मुलीचे सोनं 7054 ग्रॅम आहे. दरम्यान, उदयनराजेंवर 2 कोटी 44 लाख 63 हजार 842 रुपयांचे कर्ज आहे. 


सर्वात वयोवृद्ध खासदार कोण ?


राज्यातील सर्वात वयोवृद्ध खासदार काँग्रेसचे आहेत. कोल्हापूरचे 76 वर्षीय खासदार शाहू छत्रपती हे राज्यातील सर्वात वयोवृद्ध खासदार आहेत. शाहू छत्रपती यांनी शिवसेनेच्या संजय मंडलीक यांचा पराभव केला.


सर्वात तरुण खासदार कोण ?


राज्यातील सर्वात वयस्क आणि तरुण खासदार काँग्रेसचाच आहे. नंदूरबारचे गोवाल पाडवी हे राज्यातील सर्वात तरुण खासदार आहेत. त्यांचं वय 31 वर्षे इतके आहे. त्यांनी भाजप उमेदवाराचा दारुण पराभव केला.