Shivrajyabhishek 2024 : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Din) राज्यभरात साजरा करण्यात येतोय. या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं हे 350 वं वर्ष आहे. त्यामुळे रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्ताने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर येत आहेत. ढोलताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे.
रायगडावर शिवमय वातावरण
या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. ढोलताशांच्या गजरात शककर्ते शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे. तसेच, अनेक शाहीर कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. एकूणच किल्ले रायगडावर वातावरण अगदी शिवमय झालं आहे.
या सोहळ्यासाठी अखिल भारतीय शिवराज्यभिषेक सोहळा समितीकडून महत्वपूर्ण तयारी करण्यात आली आहे. एकूण 39 समित्या गडावर तयारीसाठी दाखल झाल्या आहेत. अनेक समित्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. गडावर 5 लाखांहून अधिक शिवभक्त दाखल होणार आहेत. होळीच्या माळावर ढाल तलवाराची मैदानी खेळाची होणार प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. खबरदारी म्हणून प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झालं आहे. या भव्य सोहळ्यासाठी 3 महिन्यांहून अधिक वेळ तयारी सुरू होती. राज्यभरातून अनेक समित्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमासाठी दाखल होणार आहेत.
'अशी' असेल सुरक्षा व्यवस्था
सर्पदंश किंवा विंचूदंशापासून सुरक्षितेसाठी सर्पमित्र नियुक्त करण्यात आले आहेत. उष्णतेचा विचार करता गड परिसरात जागोजागी पिण्याच्या पाण्याची आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आणि भोजनव्यवस्था असून, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रक्षेपण सर्व वाहिन्या आणि सोशल मीडियावर उपलब्ध करण्यात येणार आहे. गड परिसरात एलपीडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
या सोहळ्यासाठी सुमारे 150 पोलिस अधिकारी आणि एक हजार 600 कर्मचारी, चार वाहतूक पोलिस अधिकारी आणि 159 कर्मचारी, एसआरपी, एसबीआर, रायगड पोलिस दंगलनियंत्रण पथक, स्थानिक बचाव पथक आणि स्वयंसेवक हजर असणार आहेत. यासाठी बाहेरील जिल्ह्यांतूनही पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. या सर्वांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :