वर्धा : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. वर्धा (Wardha) लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्याने यावेळी वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच यावेळी आघाडीकडे मित्र पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुकांची रांग लागली होती. तर महायुतीमध्ये देखील उमेदवारी साठी इच्छुक दबक्या आवाजात इच्छा व्यक्त करीत होते. अखेर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात उमेदवारांची नावे निश्चित झाली असून नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. कापूस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओखळ असलेल्या विदर्भात वर्धा जिल्ह्याचं राजकारण हे विदर्भात केंद्रस्थानी राहिलं आहे. नागपूरनंतर वर्धा जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

क्रमांक

विधानसभा

मतदारसंघ

महायुती 

उमेदवार

महाविकास आघाडी

उमेदवार

वंचित/अपक्ष

इतर

विजयी

उमेदवार

1 वर्धा डॉ. पंकज भोयर (भाजप) शेखर शेंडे (काँग्रेस) विशाल रामटेके(वंचित)  
2 देवळी राजेश बकाने (भाजप) रणजित कांबळे (काँग्रेस) किरण ठाकरे (अपक्ष)  
3 हिंगणघाट समीर कुणावार(भाजप)  अतुल वांदिले (काँग्रेस)  उमेश म्हैसकर (बसपा)  
4 आर्वी सुमित वानखेडे (भाजप) मयुरा काळे (राष्ट्रवादी श.प.) जयकुमार बेलखेडे(प्रहार)  

वर्धा जिल्ह्यातील 4 मतदारसंघातील लढती

वर्धा

डॉ. पंकज भोयर (भाजप)
शेखर शेंडे (काँग्रेस)
डॉ.सचिन पावडे(अपक्ष)  
विशाल रामटेके(वंचित)

देवळी

राजेश बकाने (भाजप)
रणजित कांबळे (काँग्रेस)
किरण ठाकरे (अपक्ष)
उमेश म्हैसकर (बसपा)

हिंगणघाट

समीर कुणावार(भाजप) 
अतुल वांदिले (काँग्रेस) 
सुधाकर कोहळे (राष्ट्रवादी श.प.)
प्रा. राजू तिमांडे(अपक्ष)

आर्वी

सुमित वानखेडे (भाजप)
मयुरा काळे (राष्ट्रवादी श.प.)
जयकुमार बेलखेडे(प्रहार)

लोकसभेतील वर्धा पॅटर्नची चर्चा

विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी वर्धा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अनपेक्षितरित्या वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आला होता. मात्र सक्षम उमेदवार नसल्यामुळे ऐनवेळी शरद पवार गटाने काँग्रेस नेते अमर काळे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. त्यानंतर, वर्धा मतदारसंघातून अमर काळे खासदारही बनले. 

आर्वी मतदारसंघाचा इतिहास

आर्वी विधानसभा मतदारसंघात काळे घराण्याचाच वरचष्मा राहिला आहे. आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. 1962 मध्ये अपक्ष उमेदवार नारायण काळे निवडून आले. 1967 मध्ये काँग्रेसचे जे.पी. कदम आमदार राहिलेत. 1972 मध्ये अपक्ष धैर्यशील वाघ आणि1978 मध्ये शिवचंद चुडीवाल अपक्ष आमदार होते.  1980 मध्ये शिवचंद चुडीवाल काँग्रेसच्या तिकीटावर आमदार बनले. त्यानंतर 1985, 1990, 1995, 1999 असे सलग चारवेळा शरद काळे काँग्रेसकडून आमदार झाले. शरद काळे यांना राज्यात मंत्रीपदही मिळालं. 2004 मध्ये अमर काळे काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये आर्वीला झालेल्या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांनी अमर काळे विजयी झाल्यास राज्यात मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. पण अमर काळे यांचा पराभव करत दादाराव केचे यांनी प्रथमच या मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवलं. त्यावेळी अमर काळे फक्त तीन हजार 130 मतांनी पराभूत झाले. 2014 च्या निवडणुकीत अमर काळे यांनी दादाराव केचे यांचा पराभव करत काँग्रेसची जागा परत मिळवली. यावेळीही विजयाचं अंतर तीन हजार 143 मतांचंच राहिलं.

हेही वाचा

Nawab Malik: 'अजित पवार मर्द माणूस, दिलेला शब्द पाळतो...' अजितदादा प्रचार करणार समजताच नवाब मलिकांकडून तोंडभरून कौतुक!