8 Remakes of This Film Have Been Made All Were Blockbusters: एखादा चित्रपट हिट होतो न होतो, तोच त्याचा रिमेक करण्यासाठी मेकर्सच्या उड्या पडतात. ती फिल्म बॉलिवूडची बेस्ट फिल्म करण्यासाठी मग वाट्टेल त्याचा आधार घेण्यासाठी तयार असतात. मग तगडी स्टारकास्ट आणली जाते, महागड्या लोकेशन्सवर शूट केलं जातं... एका नाहीतर अनेक गोष्टी केल्या जातात. सध्या असाच एक चित्रपट बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा फॉर्म्युला एकदा, दोनदा नाहीतर तब्बल आठ वेळा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. तेही एका भाषेत नाहीतर, वेगवेगळ्या भाषांमध्ये हा फॉर्म्युला सक्सेसफुल्ल ठरला आहे.
सतत रिमेक झाले, नवनवी स्टार कास्ट घेतली, पण जेव्हा जेव्हा हा सिनेमा बॉक्सऑफिसवर आला, त्या-त्यावेळी हिट ठरला. फक्त बॉलिवूडमध्येच या चित्रपटाचा तब्बल तिनदा रिमेक करण्यात आला आहे. नुकताच याच चित्रपटाचा रिमेक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटानं फक्त तीनच दिवसांत शंभर कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता तुम्हाला कळालं असेलच आम्ही कोणत्या चित्रपटाबाबत बोलत आहोत.
तब्बल आठ वेळा रिमेक
आम्ही बोलत आहोत, भूल भुलैया चित्रपटाबाबत. बॉलिवूडमध्ये बनलेला पहिला भूल भुलैया हा रिमेक होता. त्यानंतर भूल भुलैया 2 आणि भूल भुलैया 3 देखील प्रदर्शित झाले. पहिला सायकॉलॉजिकल हॉरर चित्रपट मल्याळम भाषेत 1993 साली बनवण्यात आला होता. ज्याचं नाव मणिचित्रथजू (Manichitrathazhu) होतं. या चित्रपटाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. ज्याचा नंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये रिमेक करण्यात आला. 2004 मध्ये, ते कन्नड भाषेतील रिमेक अपथमित्र नावानं रिलीज करण्यात आला. त्याचा तमिळ रिमेक 2005 मध्ये बनला होता, ज्याचं नाव होतं चंद्रमुखी. हा चित्रपट बंगाली भाषेत 2005 साली बनला होता, ज्याचं नाव होतं राजमोहोल आणि 2007 मध्ये हा चित्रपट बॉलीवूडमध्ये बनला होता, ज्याचं नाव होतं भूल भुलैया.
मूव्ही कलेक्शन किती?
एकाच चित्रपटाच्या रिमेकनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 2007 मध्ये हा चित्रपट बॉलीवूडमध्ये करण्यात आलेल्या रिमेकला भूल भुलैया नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये पार्ट 2 रिलीज करण्यात आला आणि आता पार्ट 3 रिलीज करण्यात आला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, फिल्मनं आपल्या रिलीजच्या चौथ्या दिवशी 17.50 कोटींची कमाई केली होती. नंतर फिल्मची कमाई आता 123.50 कोटी रुपये झाली आहे. कार्तिक आर्यन, तृप्ती डीमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांचा चित्रपटाला विदेशात प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मृत्यूपूर्वी खूप दुःखी होती दिव्या भारती, गोविंदासोबत केलेली पार्टी; को-स्टारचा खळबळजनक खुलासा