Manipur Elections 2022 Phase 1 Polling : मणिपूरमध्ये भाजप, काँग्रेस आणि विविध स्थानिक पक्षांनी आगामी निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. सोमवारी मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. 60 जागांपैकी 38 जागांवरील मतदान सोमवारी पार पडणार आहे. 173 उमेदवारांचे नशीब सोमवारी मतदान पेटीत बंद होणार आहे. पूर्वोत्तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंसक घटना घडत आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील सुरक्षा अधिक कडक कऱण्यात आली आहे. तसेच दोन टप्प्यात मतदान घेतले जात आहे. 


मतदान पार पडणाऱ्या सर्व 38 मतदार संघात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तुकडी तैणात केली आहे. तसेच 9,895 मतदान अधिकारी आपल्या निर्धारित 1,721 मतदान केंद्रांवर पोहचले आहेत, अशी माहिती रविवारी निवडणूक आयोगाने दिली.  मतदान केंद्रावर कोरोना नियमांचे पालन केले जाणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांचे काटोकेरपणे पालण केले जाणार आहे, असेही निवडणूक आयोगाच्या आधिकाऱ्याने सांगितले. 


निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, बिप्लब कुमार देब, राष्ट्रीय पीपुल्स पार्टी (एनपीपी) प्रमुख कोनराड के. संगमा, काँग्रेस नेता राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी आपल्या पक्षासाठी प्रचारसभा घेतल्या.  मणिपूरमध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. चार वाचण्यापूर्वी रांगेत असणाऱ्यांना टोकण दिले जाईल, त्यानुसार मतदान करता येईल. चारनंतर मतदानाला येणाऱ्यांना मतदान करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.


 






हेही वाचा : पैसा, दारु अन् ड्रग्ज! उत्तर प्रदेशसह पाच राज्यातून एक हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीचे घबाड जप्त
ABP Opinion Poll: मणिपूरमध्ये पुन्हा भाजपची सत्ता की, काँग्रेसचा वनवास संपणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha