कल्याण : 'मागे घशात हात घालून दात काढले, आता एकमेकांचे कपडे फाडतायत. शिवसेना भाजपने शहरासाठी काही केलं नाही आताही निवडणूका पाहून लोकांना आकर्षित करण्यासाठी भांडत आहेत. पण जनता यंदा बरोबर विचार करेल,' अशी टीका कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना भाजप वादावर मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त मनसे तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका कार्यक्रमादरम्यान राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप-शिवसेनेवर टीका केली. तसचं मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर केला पाहिजे असे आवाहनही केले. कल्याण डोंबिवलीत आगामी निवडणूकांच्या आधी शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्याबाबत राजू पाटील यांनी भाष्य केलं. यावेळी मागील पालिका इलेक्शन दरम्यान भाजपकडून 'घशात हात घालून दात मोजणार' अशा संदर्भाची टीका करण्यात आली होती. आता एकमेकांचे कपडे फाडण्याबाबत बोललं जात आहे. दरम्यान याबाबत बोलताना राजू पाटील यांनी हे दोन्ही पक्ष आपआपसांत भांडतात पण शहऱासाठी काहीच करत नाहीत. असं म्हटलं आहे.
मनसेतर्फे एक दौड जवानांसाठी
डोंबिवली मनसे शहर शाखेतर्फे एक दौड जवानांसाठी गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते डोंबिवली अशी 65 किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ठाणे रायगड जिल्ह्यातील खेळाडू, डॉक्टर सहभागी झाले होते. रात्री 12 वाजता गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथून धावायला सुरवात केली. डोंबिवली येथे सकाळी 9 ला ते सर्वजण पोहोचले. महिला आणि पुरुष मिळून 100 जण यामध्ये सहभागी झाले होते. यातून मिळणारा निधी हा जवानांना मदतीसाठी दिला जाणार असल्याचं मनसे तर्फे सांगण्यात आले. या धावपटूचा सन्मान मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
हे ही वाचा
- विरोधकांना कामातून मेसेज मिळेल, खासदार श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला
- New Unlock Guidelines : आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी केंद्राकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी, वाचा नव्या मार्गदर्शक सूचना
- Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha