भाजपकडून अजूनही माढ्यातील उमेदवाराच्या नावाची घोषणा होत नसताना उठत असलेल्या अफवांचं खंडन करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रात्री अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर तातडीची पत्रकार परिषद बोलावली. भाजप ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आणणार असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं.
मी भाजपमध्ये प्रवेश केला नाही, त्यामुळे मला उमेदवारी देतील, असं वाटत नाही. उमेदवारीपेक्षा कृष्णा भीमा स्थिरीकरण होणं जास्त महत्त्वाचं असल्याचंही मोहिते पाटील म्हणाले. माढ्यातून भाजप देईल त्या उमेदवाराचा प्रचार करु आणि त्याला निवडणून आणू, असं आश्वासन विजयसिंह मोहिते पाटलांनी दिलं. तर भाजपचा उमेदवार विजयदादा ठरवतील, ते जे सांगतील ते मान्य असेल, असं वक्तव्य रणजित निंबाळकर यांनी केलं आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर माढ्यातील जागेवरुन आधी त्यांचं नाव चर्चेत होतं. त्यांनतर रणजित निंबाळकरांनी भाजपप्रवेश केल्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा झाली. आता विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा सुरु झाली. याच पार्श्वभूमीवर खासदार विजयसिंह मोहिते आणि रणजितसिंह निंबाळकर यांनी अकलूजमध्ये पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
VIDEO | पार्थ पवारांना ट्राफिकचा फटका, गाडी सोडून पळापळ
माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवारांसाठी माघार घेतली. मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यानंतर पक्षाने संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे माढ्यातील सामना नेमका कोणामध्ये रंगणार, याची उत्सुकता कायम आहे.
विजयसिंह मोहिते-पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
कोण आहेत विजयसिंह मोहिते-पाटील?
- राज्याच्या राजकारणात जी काही मातब्बर घराणी आहेत, त्यात मोहिते-पाटील घराण्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.
- सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ राजकारणी आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री
- 1980 ते 2009 दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार
- विजयसिंह मोहिते पाटील हे माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघात 2009 मध्ये शरद पवार खासदार होते.
- विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम अशी खाती सांभाळलेली आहेत.
- त्यांचे पुत्र रणजितसिंह राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार होते. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी
कोण आहेत संजय शिंदे?
- शिवसेना-भाजपच्या मदतीने सध्या सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.
- माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान भाऊ आणि मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
- निमगाव 'टेंभुर्णी'च्या सरपंचपदापासून राजकारणाला सुरुवात
- 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव
- जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले.
- पालकमंत्री विजय देशमुख यांच्या मदतीने अध्यक्ष झाले.
- म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष.
- माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन-जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष
- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषवलं.
विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार नाही, सुनील तटकरेंचा विश्वास
कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?
- सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष
- अडीच महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड
- खासदार हिंदुराव नाईक निंबाळकरांचे चिरंजीव
- स्वराज उद्योग समुहाची स्थापना
- स्वराज्य उद्योग समुहातून युवकांची फौज
- 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप शिवसेनेच्या युतीकडून हिंदुराव नाईक निंबाळकरांना उमेदवारी