Maharashta Vidhan Sabha Election: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण - संगमेश्वरच्या (Chiplun) जागेवरून महाविकास आघाडीतील (MVA) गुंता आता अधिक वाढतोय. कारण, ठाकरे गटानं या जागेवर दावा केला आहे. दरम्यान, हिच मागणी पुढे नेण्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी देवरूख इथं प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी सदरचा मतदार संघ ठाकरे गटाची (Uddhav Thacekray) ताकद पाहता विधानसभा निवडणुकीसाठी सोडला जावा अशी मागणी केली जाणार आहे. यावेळी ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनही केले जाणार आहे. या मेळाव्याला माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी देखील हजर राहणार आहेत. मुख्य बाब म्हणजे चिपळूण येथील पदाधिकारी देखील या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे आता या जागेवरचा तिढा ठाकरे गटाच्या मागणीमुळे वाढला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाची ताकद या ठिकाणी मोठी आहे. त्यासाठी हि मागणी सध्या केली जात आहे.
सुभाष बने मुलासाठी आग्रही
चिपळूण - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलेले माजी आमदार सुभाष बने आपला मुलगा रोहन बने यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी तशी मागणी देखील केली. रोहन बने हे जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. उच्च शिक्षित आणि तरूण नेतृत्व म्हणून देखील त्यांची ओळख आहे. रोहन बने यांच्या उमेदवारीची मागणी सुभाष बने यांनी थेट उद्धव ठाकरेंकडे देखील केली असल्याचं बने यांनी 'एबीपी माझा'ला सांगितलं.
शिवसेनेची ताकद किती?
या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद किती? असा देखील सवाल केला जातो. पण, जो कुणी उमेदवार महाविकास आघाडी देईल त्याला ठाकरेंच्या शिवसेने शिवाय पर्याय नाही अशी ठाम भूमिका इथल्या शिवसैनिकांची आहे. भास्कर जाधव, सुभाष बने, सदानंद चव्हाण यांनी या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. शिवसेना वाढली पाहिजे अशी मागणी करत सध्या या विधानसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या