Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांना आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. असे असताना राष्ट्रीय पक्षांनी अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नसताना  प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) यात आघाडी घेत आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात अनेक घोषणा करत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना आश्वासंने  दिले आहेत.


या जाहिरनाम्यात आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल,  बोगस आदिवासी दाखले रद्द करू आणि हक्काच्या लोकांना त्याचे हक्क देऊ,  अनुसूचित जाती-जमातीच्या उद्धारासाठी प्रयत्न करू. तर भटक्या विमुक्त समुदाय या संदर्भातील धोरण आणि  जात जनगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात येईल. असे अनेक मुद्दे मांडत प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना वंचितला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मतदारराजा वंचितची या जाहीरनाम्यावर विश्वास दर्शवत प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांना साथ देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


केजी टू पीजी शिक्षण मोफत, सर्व परीक्षा फक्त शंभर रुपयांमध्ये 


 प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये मोहम्मद पैगंबर बिल विधिमंडळात मंजूर करू, अशी मोठी घोषणा केली आहे. अल्पसंख्यांक समूहासाठी धोरण, महिला सक्षमीकरण धोरण,  महिलांना 3500 रुपये मासिक वेतनसह वर्षात तीन सिलेंडर मोफत देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासह सोयाबीन आणि कापूस वेचणी करणाऱ्या मनोरेगांकडून पाच हजार रुपये प्रति किलो वेचने अनुदान मिळणार. शेतमाल हमीभाव कायदा करणार, भाजीपाला फळ दूध आणि सर्व पिकांसाठी हमीभाव मिळणार. चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 5000 रुपये मासिक पेन्शन देऊ. नवीन उद्योगांना अनुदान देऊ. तर केजी टू पीजी शिक्षण मोफतसह शासकीय पद भरती विद्यार्थ्यांसाठी वर्षभरातील सर्व परीक्षा फक्त शंभर रुपयांमध्ये विद्यार्थी परीक्षक सुविधा उपलब्ध करून देऊ, असेही वंचितच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करण्यात आले आहे.


बौद्ध अनुयायांना मोफत धम्म सहल   


प्रति महिना घरगुती वापराची 200 युनिट वीज मोफत आणि 300 युनिट वीज ज्येष्ठ नागरिकांना मोफत मिळणार. अंगणवाडी सेविकांना अशा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी दर्जा देऊ. तर गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करू. बौद्ध अनुयायांना मोफत धम्म सहल घडवून देऊ. बेरोजगार पदविका आणि पदवीधर आणि पदवीउत्तर सुशिक्षित तरुण, तरुणांना  दोन वर्ष पाच हजार रुपये वेटिंग भत्ता मिळणार असेही वंचितने आश्वासन दिले आहे. 


हे ही वाचा