Uttarakhand Assembly Election 2022 News: उत्तराखंड विधानसभेसाठी सोमवारी म्हणजे 14 फेब्रुवारीला मतदान झाले. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. या सर्व जागांसाठी एकाट टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेस बहुमताने उत्तराखंडमध्ये सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस 70 पैकी 48 जागा मिळणार असल्याचे रावत म्हणालेत. काँग्रेसचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री काँ होणार याची घोषणा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी करतील. त्यांनी घेतलेली निर्णय सर्वांना मान्य असेल असेही रावत म्हणाले.
उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे रावत यांनी सांगितले. उत्तराखंडच्या जनतेने परिवर्तनाला कौल दिला आहे. निवडणुकांमध्ये काही सामान्य संकेत आहेत. ज्यावरून हे स्पष्ट होते की लोकांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले आहे. आता काँग्रेस उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करणार आहे. 48 च्या आसपास जागा काँग्रेसला मिळतील. उत्तराखंडसाठी गेली पाच वर्षे खूप कठीण गेली आहेत. लोकांचा स्वाभिमान दुखावला आहे. अशा स्थितीत लोकांनी परिवर्तनाला कौल दिल्याचे दिसून येत असल्याचे रावत म्हणाले.
काँग्रेसच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने 2016 मध्ये काँग्रेसचे सरकार अस्थिर झाले होते. तशी परिस्तिथी परिस्थिती उद्भवू नये, हे लोकांनी मतदान करताना लक्षात ठेवले असल्याचे रावत यांनी सांगितले. काँग्रेसच्या विजयानंतर आपण मुख्यमंत्री होणार का? असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता रावत म्हणाले की, हा निर्णय सोनिया गांधींच्या हातात आहे. काँग्रेस अध्यक्षांचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल. काँग्रसने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत ती प्रथम पूर्ण करणार तसेच राज्याची अत्थव्यवस्था सुधारण्यासाठी काम करणार असल्याचे रावत यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी उत्तराखंडमद्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान झाले आहे. सध्या उत्तराखंमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यावेळी भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे काँग्रेसने उत्तराखंडमध्ये विजयाचा आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. उत्तराखंडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठ पणाला लागली होती. तसेच काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते देखील प्रचारासाठी उत्तराखंडमध्ये आले होते. त्यामुळे आता उत्तराखंडमध्ये भाजप सत्ता राखणार की काँग्रेस परिवर्तन करणार हे 10 मार्चला समजणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: