सातारा:  राज्यातील लक्षवेधी लोकसभा लढतींमध्ये समावेश असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha Election)  सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)   यांनी मोठी आघाडी घेतली आहेत. तर भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle)   मात्र  या रेसमध्ये दिसेनासे झाले आहेत. (Lok Sabha Election Result Counting) 


शशिकांत शिंदे  यांनी सातारा  लोकसभेच्या सहापैकी सहा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे.  विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर   शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली.  उदयनराजे भोसले यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप केले. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र याचा सकाळी 10.30 पर्यंत हाती आलेल्या कलानुसार मतावर काही परिणाम झाल्याचे दिसले नाही. मतमोजणीच्या  पहिल्या अडीच तासात  मुसंडी मारली आहे. शशिकांत शिंदेंनी 27000 हजारांची आघाडी घेतली आहे. मात्र सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी  पहिल्या  फेरीची आकडेवारी  लवकर जाहीर केली नाही, असा आरोप होत होता. आतमध्ये  सातव्या फेरीपर्यंतची आकडेवारी तयार होती तरी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली नाही, असा आरोप झाला. म 


मतमोजणीचे कल हे सातत्याने बदलत


मतमोजणीचे कल हे सातत्याने बदलत आहेत. देश आणि राज्य पातळीवरील आघाडी आणि पिछाडीचे आकडे वेगाने बदत आहेत. सकाळी 10.30 पर्यंत  लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 511 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये एनडीए  270, इंडियाा 250  आणि इतर उमेदवार 23 जागांवर आघाडीवर आहे. तर महाराष्ट्रात महायुती 18 आणि महाविकास आघाडीचे उमेदवार 20  जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप  11, शिंदे गट 6, अजित पवार गट 1, ठाकरे गट 09 आणि शरद पवार गटाचे उमेदवार 10 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस पक्षाचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत. 


सातारा लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान 


 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान यावेळी झालं आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात  एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. यामध्ये 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान  कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 67.59 टक्के इतके झाले. तर सर्वात कमी मतदान पाटण विधानसभा मतदार संघात 56.95 टक्के इतके झाले. 


हे ही वाचा :


Baramati Lok Sabha : बारामतीत पवारांच्या लेकीचे पारडे जड, सुप्रिया सुळे 11 हजार मतांनी आघाडीवर