मुंबई : अनेक अभिनेते आणि अभिनत्री यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत.  त्यामध्ये आता 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरची भर पडली आहे. उद्या नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाचा पक्ष प्रवेश होणार आहे. उर्मिला काँग्रेसकडून मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


उर्मिला मातोंडकर हिचा लवकरच पक्षप्रवेश होणार असून तिला उत्तर मुंबईतून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी तगडे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात एका तगड्या उमेदवाराच्या शोधात काँग्रेस होती. त्यामुळेच उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. याआधी काँग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावं चर्चेत होती.

उत्तर पश्चिम मुंबईतून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांना उमेदवारी मिळणार असल्य़ाची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्षातून निरुपम यांच्या उमेदवारीला विरोध होता. परंतु राहुल गांधींनी निरुपम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्य़ाची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

व्हिडीओ पाहा