सोलापूर : सोलापूरच्या बार्शीमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीकडून पोलीस मालिश करुन घेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीला बार्शी तहसील कार्यालयात असलेल्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्याठिकाणचा हा प्रकार आहे.


पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी धनप्पा शेटे हे याठिकाणी होते. त्यांनी या आरोपीकडून मालिश करून घेतल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला.


व्हिडीओ सुरु असल्याची शंका येताच आरोपीने मालिश थांबवली आणि तेथून पटकन निघून गेला. या प्रकरणी अद्याप पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.