Yogi Adityanath Vs Priyanka Gandhi In Azamgarh : उत्तर प्रदेशमध्ये मतादानाचा सहावा टप्पा उद्या म्हणजे 3 मार्चला पार पडत आहे. या सहाव्या टप्प्यात एकूण विधानसभेच्या 57 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, सहाव्या टप्प्याचा प्रचार थांबला असला तरी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी यूपीमध्ये सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. आज आझमगडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. कारण एकीकडे काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री डॉ. योगी आदित्यनाथ हेदेखील निवडणूक रॅली घेणार आहेत.


दरम्यान, योगी आदित्यनाथ आणि प्रियंका गांधी या दोन्ही नेत्यांच्या आज आझमगडमध्ये जाहीर सभा होणार आहेत. तयामुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही नेत्यांच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री योगी आज दुपारी दीड वाजता आझमगडला पोहोचतील आणि प्रियांका गांधी दुपारी 4 वाजता आझमगडमध्ये येणार असून, काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करतील.


आझमगडचे राजकीय समीकरण


आझमगढच्या राजकीय समीकरणाबद्दल बोलायचे तर, आझमगडमध्ये 2 लोकसभा आणि 10 विधानसभेच्या जागा आहेत. ज्यामध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आझमगड सदर लोकसभा जागेवर खासदार आहेत. बसपच्या संगीता आझाद लालगंज राखीव लोकसभा जागेवरून खासदार आहेत. दुसरीकडे विधानसभेच्या 10 जागांवर नजर टाकली तर 10 पैकी 5 जागा समाजवादी पक्षाच्या ताब्यात आहेत, तर 4 जागा बहुजन समाज पक्षाच्या खात्यात आणि एक जागा भारतीय जनता पक्षाच्या खात्यात आहे. या जागेवर बाहुबली नेते रमाकांत यादव यांचा मुलगा अरुण कांत यांनी कमळ फुलवले होते. मात्र, यावेळी त्यांचे वडील रमाकांत यादव रिंगणात असल्याने पिता-पुत्र दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


प्रियंका गांधींनी लावली ताकद 


प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेबद्दल बोलायचे झाले तर त्यांची जाहीर सभा राणीच्या सरायमध्ये होणार आहे. काँग्रेससाठी ही जाहीर सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसला येथे ना लोकसभेत खाते उघडता आले आहे ना विधानसभेत. आझमगड जिल्ह्यातील जातीय समीकरणाबद्दल बोलायचे झाले तर इथे कोणाला जिंकायचे आहे हे मुस्लिम, दलित आणि मागासवर्गीय ठरवतात. ज्याच्या खात्यात ही मते जातात त्यांचा विजय ठरतो. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्ष येथे विजयासाठी प्रयत्न करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: