UP Election Result 2022: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पाच राज्यांमध्ये विविध पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत. यूपीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने सपापेक्षा आघाडी मिळवली आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे. जनता यांच्यावर नाराज असून याचा काही परिणाम तर दिसून येणारच, असं ते म्हणाले आहेत. 


कोणत्याही पक्षाचे नाव न घेता राकेश टिकैत म्हणाले की, ''लढाई तेव्हा होते जेव्हा चोर बेईमानी करतात. हे लोक बेईमान आणि गुंड आहेत.'' ते पुढे म्हणाले की, यांच्यावर जनता नाराज असून यावेळी हा पक्ष जिंकणार नाही, असं जनता म्हणत आहे.''


राकेश टिकैत असं म्हणाले असले तरी यूपीत पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासूनच भाजपने चांगलीच आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला आहे. ताज्या ट्रेंडनुसार, भाजपने 267 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर समाजवादी पक्ष 125, काँग्रेस 5 आणि बसपा 4 जागांवर आघाडीवर आहे.    


दरम्यान, केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होत. हे आंदोलन जवळपास एक वर्ष चाललं. त्यानंतर केंद्र सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे मागे घेतले होते. या आंदोलनाचा मोठा फटका भाजपला उत्तर प्रदेश निवडणुकीत पाहायला मिळेल, असं बोललं जात होत. मात्र आता मतमोजणीतून समोर आलेल्या आकडेवारीनुसार तसं होताना दिसत नाही आहे.    


महत्त्वाच्या इतर बातम्या :