The Kapil Sharma Show Kajur Comedy : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.   कपिल शर्मा (Kapil Sharma),कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek),भारती सिंह (Bharti Singh),किकू शारदा (Kiku Sharda)  हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या मालिकेतील बालकलाकार कार्तिकेय राज (Kartikey Raj) या मालिकेत खजूर नावाच्या मुलाची भूमिका साकारतो. 


कार्तिकेय हा मुंबईमध्ये राहतो. तो द कपिल शर्मा शो या मालिकेच्या एका एपिसोडसाठी एक लाख पन्नास हजार रूपये मानधन घेतो. 'बेस्ट ड्रामेबाज' या शोमध्ये कार्तिकेय सुरूवातीला काम करत होता. या कार्यक्रमात कपिलनं कार्तिकेयला पाहिलं. तेव्हा कपिलनं त्याला द कपिल शर्मा शो या शोमध्ये काम करण्यासाठी ऑफर दिली. 






 23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे.


संबंधित बातम्या


'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज


Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha