Up Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आज शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही आणि सोनभद्र या जिल्ह्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू आहे. या टप्प्यात एकूण 613 उमेदवार 54 जागांवर आपले नशीब आजमावत आहेत, ज्यात सुमारे 2.06 कोटी मतदारांचा समावेश आहे. या 54 जागांमधील 11 जागा या अनुसूचित जातींसाठी आणि दोन अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. या शेवटच्या टप्प्यात  संध्याकाळी 5  वाजेपर्यंत सुमारे  54 टक्के   मतदान झाले आहे. 


54 जागांपैकी 48 जागांवर भाजपचे उमेदवार


सातव्या टप्प्यात भाजपने पक्षाच्या निवडणूक चिन्हावर 54 जागांपैकी 48 उमेदवार उभे केले आहेत. तर मित्र पक्ष अपना दल (एस) आणि निषाद पक्षाने प्रत्येकी 3 उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे, समाजवादी पक्षाने आपल्या चिन्हावर 45 उमेदवार उभे केले आहेत. तर मित्रपक्ष एसबीएसपीने सात उमेदवार उभे केले आहेत आणि अपना दल (के) ने दोन उमेदवार उभे केले आहेत.


कोणत्या टप्यात किती झालं मतदान?



  • पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी 62.43 टक्के मतदान 

  • दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी 64.66 टक्के मतदान

  • तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी रोजी 62.28 टक्के मतदान  

  • चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारी रोजी 62.76 टक्के मतदान

  • पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी रोजी 58.35 टक्के मतदान  

  • सहाव्या टप्प्यात 3 मार्च रोजी 56.43 टक्के मतदान  

  • सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.40 टक्के मतदान


दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहे. 


संबंधित बातम्या: