UP CM : उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मार्च रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी औपचारिक निवड करण्यात येणार आहे. त्यांच्या नावावर सर्व आमदार सहमत होतील आणि त्यानंतर 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.


मिळालेल्या माहितीनुसार, रघुवर दास यांच्या उपस्थितीत लोकभवनात 24 मार्च रोजी दुपारी 4 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात येणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांबाबतही निर्णय होऊ शकतो. यानंतर 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा लखनौमधील शहीद पथावरील एकना स्टेडियमवर होणार आहे. त्याची जय्यत तयारीही सुरू झाली आहे.


योगी मंत्रिमंडळात यावेळी दोन ते चार उपमुख्यमंत्री?
मागील कार्यकाळात योगी मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री होते. त्याचबरोबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी योगी मंत्रिमंडळात दोन ते चार उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केशव प्रसाद मौर्य यांच्याशिवाय बेबी राणी मौर्य, असीम अरुण आणि ब्रजेश पाठक यांची नावे उपमुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha