UP Election 2022 : आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. कोणाच्या विरोधात कोणता उमेदवार मैदानात उतरवायचा याची गणितंं जुळवण्याच्या कामात सध्या पक्ष गुंतले आहेत. परंतु, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार नाही. 


उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंह यादव आणि गांधी कुटुंब वर्षानुवर्षे आपली राजकीय मैत्री निभावत आहेत. मंगळवारी काँग्रेसने करहाल येथील उमेदवार ज्ञानवती यादव यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. करहाळमधून अखिलेश यादव निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी सोमवारी उमेदवारी दाखल केली. त्यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी दिली आहे.


आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज काँग्रेसकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. पक्षाने करहाळमधून ज्ञानवती यादव यांना तिकीट दिले होते. दुसरीकडे जसवंत नगरमधून काँग्रेसच्या एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. मुलायम सिंह यांचे बंधू शिवपाल सिंह यादव येथून निवडणूक लढवत आहेत. समाजवादी पक्षाने अमेठी आणि रायबरेलीमधून आपले उमेदवार उभे केलेले नाहीत.


सोनिया गांधी - रायबरेली लोकसभेच्या जागेवर 2009 पासून समाजवादी पक्ष सोनियांच्या विरोधात उमेदवार देत नाही. सोनिया गांधी 2004 पासून निवडणूक लढवून जिंकत आहेत. 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने या जागेवरून आपला उमेदवार उभा केला नव्हता.


राहुल गांधी - 2004 ते 2014 पर्यंत सपाने कधीही अमेठीत राहुल गांधींच्या विरोधात उमेदवार दिला नाही. 2004 ते 2014 पर्यंत राहुल गांधी इथून सतत खासदार होते. पण 2019 मध्ये त्यांचा स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला.


मुलायम सिंह यादव- 2009 ते 2019 या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मैनपुरीमधून मुलायम सिंह यादव यांच्या विरोधात एकही उमेदवार उभा केलेला नाही. मुलायम सिंह यादव यांनी 2014 मध्ये मैनपुरी आणि आझमगड या दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली होती. काँग्रेसने आझमगडमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मैनपुरीमध्ये उमेदवार दिला नाही.


अखिलेश यादव - काँग्रेसने 2009 मध्ये कन्नौज आणि 2019 मध्ये आझमगडमध्ये अखिलेश यादव यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही.


डिंपल यादव – काँग्रेसने 2014 आणि 2019 कन्नौज लोकसभेच्या जागेवर डिंपल यादव यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही. परंतु, 2009 च्या फिरोजाबाद लोकसभा पोटनिवडणुकीत डिंपल यांचा काँग्रेसच्या राज बब्बर यांच्याकडून पराभव झाला.


महत्वाच्या बातम्या


ABP Opinion Poll: अर्थसंकल्पामुळे पाच राज्यात भाजपाला फायदा होईल का? जनतेनं दिलं चकित करणारं उत्तर