Maharashtra Assembly Election 2024: हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा आदेश म्हणून जी ओझी आपण डोक्यावर घेतली होती. ही डोक्यावरची ओझी उतरवा आणि हातात पवित्र भगवा घेतलेले हर्षद आणि अमित यांना विधानसभेत निवडून पाठवा असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाटण येथील सभेतून केल आहे. महाविकास आघाडीचे पाटण विधानसभेचे अधिकृत उमेदवार हर्षद कदम ह्यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पाटण येथे घेण्यात आली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी करत सरकारवर कडाडून टीका केली आहे.


आगामी काळात पैसे उधळले जातील. अनेक ठिकाणी असा प्रकार होत आहे. म्हणून हे लुटारू असून महाराष्ट्र लुटलाय निघायला निघाले आहे लुटलेले पैसेच ते वाटताय.  केलीय लुट भारी, आता पुढची तयारी अशी परिस्थिती आहे. तर पुढची तयारी म्हणजे तर संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि आदानीच्या चरणी वाहून द्यायचा. आणि अशा लाचार आणि बुटचाट्यांच्या हातात नुसतं मत नाही तर आपली अस्मिता आपला महाराष्ट्र परत देणार आहोत का? असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाटण येथील सभेतून केल आहे


ज्याला होम मिनिस्टर केल, त्यानीच पळून जायला मदत केली- उद्धव ठाकरे


शाळा, खाणी अदानींना दिला. सातबाऱ्यावर जर अदानीचे नाव लागले तर तुम्ही काय करणार? मोदी बाबा आले, माझे नाव घेण्यास ते घाबरतात. तोडा फोडा आणि राज्य करा हे भाजपचे सूत्र आहे. कोणाला जिंकवायचे आता तुम्ही ठरवा. मात्र महाराष्ट्र ओरबडताय... आपण थंडपने बसलोय. शिवसेनेमध्ये एक बेन आल तेंव्हा कसं होत. यांना आम्ही होम मिनिष्टर केल, मात्र त्यांनी पोलिस खात वापरल आणि पळून जायला मदत केली. कशाला तर ढोकळा खायला. गुजरातचा ढोकळा आवडत  असेल तर तीकडेच जा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना टोला लगावला आहे.


उठा उठा निवडणुक आली लोकांकडे जाण्याची वेळ आली  


नुकतीच दिवाळी झाली आणि या दिवाळी दरम्यान एक जाहिरात दाखवली जाते जी केवळ दिवाळीपुरतीच दाखवली जाते. उठा उठा दिवाळी आली, मोती साबनाने आंघोळ करायाची वेळ आली, अगदी त्याच प्रमाणे उठा उठा निवडणुक आली लोकांकडे जाण्याची वेळ आली असे दोन उमेदवार पाटण येथे आहेत. मात्र हर्षद त्याला अपवाद आहे. आता तुम्हाला ठरवायचे आहे. तुम्हाला देखील पाकिटातून साबन येईल, मात्र आजवर जिल्ह्यात इतर दोघां उमेदवारांकडेच सत्ता होती. असे असतांना तुमच्या आमच्यात काय बदल झाला? दरड कोसळली, घरे गेली, पुनर्वसन किती लोकांचे झाले? पैसे खाल्लेत. कारण त्यांना जाब विचारनारे कोणी नाहीत. मात्र शिवसेना आणि शिवसैनिक एकदा भिडला की काय करतो हे आता आता, असा थेट इशाराही उद्धव ठाकरे यांनी भर सभेतून दिला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray Exclusive : राज ठाकरेंशी युती का झाली नाही? उद्धव ठाकरेंनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांचं राज'कारण'