India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. नुकतीच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 0-3 अशी पराभूत झाल्याने भारतीय संघ सध्या खूप दबाव आहे. मागील दोन वेळा, टीम इंडियाने अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली होती.
आता कर्णधार रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. पण तो वैयक्तिक कारणांमुळे पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असे बोले जात होते. मात्र आता भारतीय कर्णधार रोहित शर्माला मुलागा झाला, त्यामुळे तो पर्थ कसोटीपूर्वी संघात सामील होणार असल्याचे दिसत आहे. भारतासाठी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे रोहितसोबत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकतो. बीसीसीआय लवकरच हा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शमी पर्थमधील पहिल्या कसोटीपूर्वी रोहित शर्मासोबत ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. मात्र, हे दोन्ही खेळाडू सलामीच्या सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सहभागी होऊ शकतील की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. दुखापतीमुळे जवळपास वर्षभर बाहेर असलेला शमी वेळेवर बरा न झाल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या संघात स्थान मिळाले नाही.
मोहम्मद शमीचे बालपणीचे प्रशिक्षक मोहम्मद बद्रुद्दीन यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना खुलासा केला की, स्टार वेगवान गोलंदाज ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर टीम इंडियामध्ये सामील होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. ते म्हणाला, "तो ॲडलेड (दुसऱ्या) कसोटीनंतर भारतीय संघात सामील होईल. आता तो परत आला आहे आणि त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे, विकेट्स घेतल्या आहेत, दौऱ्याच्या उत्तरार्धात तो संघासाठी महत्त्वाचा असेल.”
2024 च्या रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश विरुद्ध बंगालकडून खेळून शमीने जोरदार पुनरागमन केले आहे. या स्टार वेगवान गोलंदाजाने शानदार पुनरागमन करत चार विकेट घेत मध्य प्रदेशची फलंदाजी बोलती बंद केली. शमीने 19 षटकात 54 धावा देत चार विकेट घेतल्या. यामध्ये शुभम शर्मा, सरांश जैन, कुमार कार्तिकेय आणि कुलवंत केजरोलिया यांच्या महत्त्वाच्या विकेट्सचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज शमीने दुसऱ्या डावातही आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत आणखी तीन बळी घेतले. याशिवाय त्याने फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले आणि 36 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 37 धावा केल्या.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
हे ही वाचा -