Uddhav Thackeray on Amit Shah, सांगोला : "सांगोल्यापासूनचा सर्व पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा पट्टा आहे. ते साखर कारखाने असतील, सहकारी बँका असतील. स्वातंत्र्यानंतर सहकार हा विषय राज्याचा होता, पण केंद्रामध्ये सहकार खातं तयार केलं गेलं. ते खातं अमित शाहांनी स्वत:कडे ठेवलंय. धाडी पडल्यानंतर अजित पवार वगैरे सगळे पळत आहेत. त्यांना निवडून देण्यासाठी प्रचार करत आहेत. त्यांना माहिती नाही, वापरा आणि फेका अशी भाजपची निती आहे. यांनी फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून जाहीर केलं. अजित पवार आणि शिंदेंना भांडी घासावी लागतील. तुमचा उपयोग संपला. तसंच उद्या हे सहकार क्षेत्र अमित शाह गिळणार नाही कशावरुन? सहकारी बँका उद्योगपतींच्या घशात घालणार कशावरुन?", असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते सांगोला येथे बोलत होते.
मुख्यमंत्री असताना एकतरी उद्योग गुजरातला नेऊ दिला का?
उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार आल्यावर उद्योगपतींकडून जमीन काढून गोरगरिबांना घरे बांधून देणार आहे. मोदी शहा यांच्या टपला मारून जातील, आम्ही स्वाभिमानी लोकं सहन करणार नाही. अमित शाहांना सहकार क्षेत्र उद्योगपतींना द्यायचे आहे. देशापेक्षा राज्यातील निवडणूक महत्वाची वाटत असेल तर पडे सोडून भाजपचे स्टार प्रचारक बना. तुम्ही मन की बात करता आम्ही जन की बात करतो. मुख्यमंत्री असताना एकतरी उद्योग गुजरातला नेऊ दिला का? म्हणून सरकर पाडले. मला महाराष्ट्राची स्वप्ने पडतात मुख्यमंत्रिपदाची नाही.
लाथ मारल्या तरी चालतील पण भाजपाच्या पालख्या वाहा असे विचार होते का बाळासाहेबांचे?
प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे मंदिर बांधणार आहे. सुरतेला देखील बांधणार आहे. मुलींसोबत प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण देणार आहे. कोणीही मागणी न करता मी 2लाखापर्यंत कर्जमुक्ती करून दाखवली. गाडगे बाबांचे चरित्र आजोबांनी लिहिले. घरी आले तरी बाहेर बसून शिळे भाकर तुकडा द्या म्हणायचे. त्यांनी दिलेली शिकवण दशासुत्री कोणताच राजकीय पक्ष देत नाहीत. माणुसकीची शिकवण विसरायला लागले. धर्मा-धर्मात भांडणे लावून पेटवून राजकारण करायचे असेल तर मी ते हिंदुत्व मानत नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचाराने पुढे जात आहे. लाथ मारल्या तरी चालतील पण भाजपाच्या पालख्या वाहा असे विचार होते का बाळासाहेबांचे? असा टोलाही ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
इतर महत्त्वाच्या बातम्या