Sudhir Mungantiwar : अर्ज मागे घेण्याची तारीख गेली असली, तरीही महाविकास आघाडीने आता निवडणूक आयोगाला सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी पत्र देण्याची गरज आहे. तसंही महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आता येणार नाही, अशी टीका भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
पाप केल्यावर कोविड होतो
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना पण कोविड झाला होता, असे म्हटले आहे.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा आमच्या कम्प्युटरमध्ये टाईप केलेला दिसतोय
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महाविकास आघाडीचा जाहीरनामा आमची नक्कल केली असेल, आमच्या कम्प्युटरमध्ये त्यांनी टाईप केलेला दिसत आहे. त्यांची कॉपी पेस्ट करायची सवय आहे. त्यांचा खोटारडेपणा खुर्चीत येऊन थांबतो, त्यांचे शिक्षक पश्चात्ताप करत असतील, यांना आम्ही चुकीचे शिकवले का? बटेंगे तो कटेंगे हे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांनी म्हटले आहे. सर्व जाती व धर्मांनी एकत्र राहण्यास आम्ही सांगत आहोत, मुस्लिम लोकांना भीती दाखवण्याचे काम करत आहेत. ज्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास आहे प्रेम आहे ते काँग्रेस सोबत राहूच शकत नाही.
रयतेचे राज्य आणण्यासाठी महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या
भाजप जाहीरनाम्यावर बोलताना ते म्हणाले की, भाजपकडून अमित शाह यांच्या हस्ते संकल्प पत्र 2024 सादर करण्यात आला. रयतेचे राज्य आणण्यासाठी महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. शेतकऱ्यांना खतांमार्फत घेतलेला कर परत करण्याचा निर्णय घेणार आहोत. फक्त घोषणा नव्हे तर संकल्प पूर्ण करण्यासाठी पद्मविभूषण, पद्मश्री अशा लोकांची मदत घेतली जाईल. काँग्रेस काळात जाहीरनामा म्हणजे धूळ खात पडलेला कागद होता. याउलट आमचे संकल्प पत्र हे महाराष्ट्राचा 1 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने जाणारी अर्थव्यवस्था असेल.
इतर महत्वाच्या बातम्या