Assembly Elections Result 2023: ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. त्रिपुरामध्ये (Tripura Election 2023) भाजप (BJP) पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येणार आहे. दुसरीकडे नागालँडमध्ये भाजप आणि त्यांचा सहयोगी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर मेघालयमध्ये (Meghalaya Election 2023) त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे. 


त्रिपुरामध्ये (Tripura Election 2023) सत्ताधारी भाजप + आयपीएफटी आघाडीला बहुमत मिळत असल्याचे दिसत हे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजप (BJP) युती 34 जागांवर आघाडीवर आहे. डावे आणि काँग्रेस आघाडीला 14 जागांवर आघाडी आहे. दुसरीकडे टीएमपीने (TMP) सर्वांनाच धक्का दिला आहे. येथे टीएमपी 12 जागांवर पुढे आहे. त्रिपुरामध्ये (Tripura Election 2023) भाजपच्या (BJP) मोठ्या विजयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. 


Assembly Elections Result 2023: मेघालयात एनपीपी आघाडीवर 


मेघालय (Meghalaya Election 2023) विधानसभेच्या 59 जागांसाठी मतदान झाले. मात्र राज्यात 60 जागा असून उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवर निवडणूक झाली नाही. ताज्या आकडेवारीनुसार, एनपीपी 25 जागांवर आघाडी घेऊन राज्यातील एकमेव सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसत आहे. मेघालयमध्ये (Meghalaya Election 2023) नर्तियांग या एका जागेवर निकाल जाहीर झाला असून, तो एनपीपीच्या खात्यात गेला आहे. भाजपने एकट्याने निवडणूक लढवली असून 3 जागांवर आघाडी घेतली आहे. तर मेघालयमध्ये (Meghalaya Election 2023) ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांचा टीएमसी पक्ष 5 जागांवर आघाडीवर आहे, तर इतरांच्या खात्यात 26 जागा दिसत आहेत.


Assembly Elections Result 2023: भाजप युतीचा विजय जवळपास निश्चित 


नागालँडमध्ये (Nagaland Election 2023) भाजप (BJP) आणि एनडीपीपी युती प्रचंड बहुमताने परतताना दिसत आहे. दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजप युती 60 पैकी 36 जागांवर आघाडीवर आहे. राज्यात भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. भाजपचे कामेझो किनिमी बिनविरोध विजयी झाले आहेत, तर तुएनसांग सदर-1 जागेवर भाजपच्या (BJP) उमेदवाराने काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला आहे. मुख्य विरोधी नागा पीपल्स फ्रंट (NPF) केवळ दोन जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला (Congress) एकही जागा येथे मिळताना दिसत नाही आहे, तर इतर 22 जागांवर पुढे आहेत.


इतर महत्वाची बातमी: 


Maharashtra Political Crisis: हरिश साळवेंचं पुन्हा उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर बोट; राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी होळीनंतर