Uttarakhand Assembly Elections 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, आज आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. केजरीवाल यांनी यावेळी मोठ्या घोषणा केल्या आहेत. उत्तराखंडमध्ये जर आम आदमी पक्षाचे सरकार आले तर मोफत वीज, रोजगार भत्ता आणि महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये देण्याची घोषणा अरविंदे केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल यांनी आज हरिद्वारमध्ये पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
उत्तराखंडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टचार आहे, तो भ्रष्टाचार आम्ही पूर्णपणे बंद करु असेही ते यावेळी म्हणाले. तसेच दिल्लीप्रमाणे उत्तराखंडमध्ये गेखील 24 तास मोफत वीज देऊ. मागच्या काही वर्षांमध्ये दिल्लीमध्ये आम्ही 10 लाख रोजगार दिले आहेत. उत्तराखंडमध्ये प्रत्येक व्यक्तीला सरकारी नोकरीची समान संधी मिळणार आहे. जोपर्यंत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत पाच हजार रुपये रोजगार भत्ता दिला जाईल. 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये दिले जातील असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी बोलताना भाजप आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. उत्तराखंडमध्ये 10 वर्ष काँग्रेसचे आणि 11 वर्ष भाजपची सत्ता उपभोगली. एवढ्या वर्षात या लोकांना उत्तराखंडमध्ये भ्रष्टाचार सोडून काहीच केले नसल्याचा आरोप त्यांनी लगावला. उत्तराखंडची दुर्देशा करण्यात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षााचा हात असल्याचे केजरीवाल म्हणाले.
उत्तराखंडमध्ये आम्ही शाळांवर काम करू, इथे सरकारी शाळा मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे शाळा दुरुस्त कर. तसेच याठिकाणी सर्वांना मोफत शिक्षण दिले जाईल असेही केजरीवाल यांनी सांगितले. तसेच आम्ही रुग्णालये दुरुस्त करू, या ठिकाणी लोक लांबून चालत दवाखान्यात जातात. इथे गावा-गावात मोहल्ला दवाखाने बनवू, हॉस्पिटल्स तयार करू. प्रत्येक व्यक्तीवर मोफत उपचार करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच रस्ते दुरुस्त करू, तसेच यात्रेकरूंना सुलभ अयोध्येला येता य़ेईल असी व्यवस्था करु, मुस्लिमांना अजमेर शरीफची भेट घडवून देणार. शीख आणि ख्रिश्चनांना त्यांच्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करायला लावणार तसेच .
उत्तराखंडला आध्यात्मिक राजधानी बनवू, पर्यटनाचा विकास करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.