Jayant Patil on Ajit Pawar : आमचं घड्याळ चिन्ह चोरीला गेलं आहे. पण, पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे. ऑस्ट्रेलियात, चीन, पाकिस्तानमध्ये जावा, पण अशी नौबत कोणत्याच पक्षावर आली नाही. आमचं हे चिन्ह आहे, पण न्यायप्रविष्ठ आहे हे सांगावं लागतं आहे, आमचं घड्याळ चोरीला गेलं आहे त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस आम्ही चिन्ह घेतलं आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला. 






राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार


सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात जाऊन मला शंभर टक्के खात्री पटली आहे की,लोकं महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत आणि राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. आपली सभा या क्रांती चौकातून होत आहे. याच चौकातून जिल्ह्यात ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन पुकारले गेले होते. याच क्रांती चौकातून क्रांती घडवण्याची संधी आपल्याला मिळाली. या भागाला स्मार्ट सिटी बनवणार होते. 10 वर्षात झाले का आपले शहर स्मार्ट? या शहरात बऱ्याच नव्या गोष्टी आपण आणू शकतो त्यासाठी महेश कोठे सारखा दूरदृष्टी असणारा, नगरपालिकेचा अनुभव असणारा माणूस विधानसभेत पाठवला पाहिजे. महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभी आहे, तुम्हीही भक्कमपणे साथ द्या.


जयंत पाटील यांनी सांगितले की, गुजरातला फॉक्सकाॅन गेले त्यावर हे काही बोलले नाहीत. दीड लाख नोकऱ्या मिळाल्या असत्या. मोदींनी सांगितलेले त्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ पण तो प्रकल्प आजतागायत आलेला नाही. शिंदे लोकांना घेऊन दावोसला गेले तिथून अनेक गुंतवणूक आल्याच्या पुड्या सोडल्या. गुंतवणूक तर आली नाहीच पण तिथल्या हॉटेल वाल्याने बिल पाठवले, ते भरा म्हणून सांगितले. ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच त्यांनी दावोसमध्ये केले असा टोला त्यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या