D K Shivakumar : भाजपकडून खोटा प्रचार सुरू आहे, कर्नाटकमध्ये सरकारकडून जे वादे करण्यात आले ते पूर्ण केले नाहीत, असा खोटा प्रचार भाजपकडून सुरू आहे. मात्र, महायुतीच्या सर्व नेत्यांना मी आमंत्रित करतो, त्यांच्या येण्या जाण्याचा सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टर्ड आम्ही देतो. त्यांनी येऊन आमच्या योजना बघाव्यात अशा शब्दात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार यांनी पीएम मोदी यांनी केलेल्या टीकेवर घणाघाती प्रहार केला. आज काँग्रेसशासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये एकत्र येत मोदींकडून झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मोदी यांनी महाराष्ट्रामधील पहिल्या सभेमध्ये बोलताना काँग्रेसची योजना फसव्या असल्याचे म्हणत जी योजना, आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत अशी टीका केली होती. या टिकेचा समाचार घेत आज काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि प्रत्युत्तर दिले.
महायुतीला आम्ही कर्नाटकमध्ये येण्यासाठी आमंत्रित करत आहोत
शिवकुमार यावेळी बोलताना म्हणाले की भाजपने आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. महायुतीला आम्ही कर्नाटकमध्ये येण्यासाठी आमंत्रित करत आहोत. आम्ही घोषणा केलेल्या सर्व योजना सुरू आहेत ते त्यांनी एकदा येऊन पाहावे. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या खोट्या गोष्टी समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र आले आहेत. ही देशातील ऐतिहासिक पत्रकार परिषद आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले की पंतप्रधान यांनी खोटे बोलणं सोडलं सोडलेलं नाही तर आम्ही खरं बोलणं सोडणार नाही. तेलंगाणामध्ये आम्ही योजना राबविल्या आहेत, याची वस्तुस्थिती तुमच्यासमोर ठेवणं माझी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. मोदी यांनी शेतकऱ्यांवर काळा कायदा लादल्याच ते म्हणाले. मोदी अदानी आणि अंबानींसाठी काम करत आहेत. तेलंगणात 17000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली. सोनिया गांधी यांनी तेलंगणा प्रदेश बनवण्याची गॅरंटी दिली होती.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार गुजरातचे गुलाम बनून काम करत आहेत
ते म्हणाले की, दहा महिन्यांमध्ये आम्ही पन्नास हजार नोकऱ्या दिल्या. पाचशे रुपयांमध्ये सिलेंडर दिला. 200 युनिट मोफत देण्यात आली. महिलांसाठी मोफत प्रवास दिला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गुजरातचे गुलाम बनून काम करत आहेत, अशा शब्दात रेवंत रेड्डी यांनी दोघांवर तोफ डागली. दरम्यान हिमाचलचे मुख्यमंत्री हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी सुद्धा हल्लाबोल केला. ते म्हणाले की हिमाचलमध्ये 5000 रुपये मिळायचे, पण आमच्या जुन्या पेन्शनमुळे 50 हजार रुपये मिळू लागले आहेत. 27 वर्षांपासून 5000 अनाथ मुलांना आम्ही पालकत्व दिलं आहे. हे देशातील एकमेव राज्य आहेत ज्या ठिकाणी गाईचे दूध 45 आणि म्हशीच्या दुधाला 55 रुपये किंमत निर्धारित केली आहे. 18 वर्षावरील मुलींना आम्ही पंधराशे रुपये देत आहोत. विधवा महिलांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च सरकारने उचलला आहे. महाराष्ट्रात निवडणूक आहे आणि हिमाचल प्रदेशची चर्चा होत आहे. आम्ही सत्ता सुख घेण्यासाठी नाही आलो, मनमोहन सिंग यांच्यानंतर राहुल गांधी यांना संधी होती असेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही परिवर्तनासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या