Thane Assembly Election 2024 : ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी सत्ता राखली आहे. ठाणे शहर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण, ठाणे आणि शिवसेना हे समीकरण गेल्या दोन टर्ममध्ये फिस्कटल्याचं दिसत आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत ठाणे शहर विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकल्याने यंदाही या मतदारसंघात भाजप जोमानं उतरली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी दिली होती, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. यातच मनसेने अविनाश जाधव यांनी तिकीट दिलं होतं. यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघाची 2024 ची निवडणूक शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. मात्र, अखेर भाजपच्या संजय केळकर यांनी बाजी मारली.


ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास


ठाणे शहर शिवसेनेचा गड मानला जातो, पण, 2014 च्या निवडणुकीत भाजपने हा गड शिवसेनेकडून हिसकावून घेतला. 2014 मध्ये संजय केळकर यांनी रविंद्र फाटक यांचा पराभव केला.त्यानंतर 2019 मध्ये संजय केळकर यांनी अविनाश जाधव यांनी टफ फाईट दिली, अविनाश जाधन यांना 70 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. भाजप आणि शिवसेनेवर नाराज शिवसैनिकांनी मनसेला मतदान केल्याची चर्चा होती. पण तरीही संजय केळकर 20 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. 


सध्याची परिस्थिती


भाजपने संजय केळकर यांना सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. कधी काळी शिवसेनेचा गड असलेल्या ठाणे मतदारसंघात सध्या भाजप वरचढ आहे. 


मतदारसंघातील समस्या


ठाणे शहर मतदारसंघात वाहतूक कोंडी, पुर्नविकास आणि अनधिकृत बांधकाम या महत्त्वाच्या समस्या आहेत. घोडबंदर रोडवर दररोज होणारी वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यासोबत झोपडुपट्टी पुर्नविकासाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. याशिवाय पाणीटंचाई हा देखील मुद्दा आहे. 


ठाणे विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा निकाल 



  • संजय केळकर - भाजपा (विजयी)

  • राजन विचार - शिवसेना उद्धव ठाकरे

  • अविनाश जाधव - मनसे 


2019 चा निकाल



  • संजय केळकर - भाजपा (92,298 मते) विजयी

  • अविनाश जाधव - मनसे (72,874 मते)

  • रविंद्र फाटक - शिवसेना (58,296 मते) 


2014 चा निकाल



  • संजय केळकर - भाजपा (70,884 मते)

  • रविंद्र फाटक - शिवसेना (58,296 मते)

  • वसंत डावखरे - राष्ट्रवादी (24,320 मते)


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kopri-Pachpakhadi Assembly Election 2024 : कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ : एकनाथ शिंदे बाजी मारणार की मतदार भाकरी फिरवणार?