मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेणार आहेत. अहमदनगरची जागा काँग्रेसला सुटली नाही, तर सुजय भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे.


सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेले, तरी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस सोडणार नाहीत. सुजयने 'माझा'शी बोलताना 'मी स्वतंत्र व्यक्ती आहे, मी वेगळा निर्णय घेऊ शकतो' असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसकडून नगरची जागा न मिळाल्यास भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी केल्याचं म्हटलं जातं.

राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी बोलताना सुजय आपले निर्णय घेण्यास मोकळे असल्याचं सांगत संकेत दिले होते.

सुजय यांना नगरमधून रिंगणात उतरायचं असल्यास त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. मात्र सुजय यांना राष्ट्रवादीत घेऊन तिकीट देण्याऐवजी काँग्रेसला नगरची जागा सोडावी असा काँग्रेसचा आग्रह होता.

VIDEO | दहा मिनिटांत निवडणुकीची खबरबात | वारे निवडणुकीचे



काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच नगरच्या प्रश्नात लक्ष घालणार असल्याची माहिती आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी दक्षिण नगरच्या जागेबाबत मध्यस्थी करणार आहेत. औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांवरुन अजूनही आघाडीमध्ये अंतिम निर्णय झालेला नाही.

सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु असतानाच काल त्यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांसोबत हेलिकॉप्टरने एकत्र प्रवास केला होता.
संबंधित बातम्या:


लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेस सुस्त, पक्षश्रेष्ठी नाराज


आघाडीतील अहमदनगरचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी मध्यस्थी करणार

'औरंगाबादची जागा घ्या, अहमदनगरची जागा द्या'; काँग्रेसने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिल्याची चर्चा

शरद पवार आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्यातील वाद विसरुन सुजय राष्ट्रवादीकडून लोकसभा लढणार?