पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली अर्टिगा कार बोरघाटात पोहचली होती. तीव्र उतार असल्याने चालकाचा अचानक ताबा सुटला आणि पुढे धावणाऱ्या ट्रकला गाडी मागून धडकली.
दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी झालेल्या या भीषण अपघातात सर्व प्रवासी अत्याव्यस्त पडले होते. अपघातग्रस्तांना मदत पोहचेपर्यंत तिघांचा जागीच मृत्यू झाला होता, दोघे गंभीर जखमी होते, तर एकाला किरकोळ इजा झाली होती.
VIDEO | नाशिकमध्ये विद्यार्थ्याला शिक्षिकेची बेदम मारहाण
अपघाताच्या अकरा मिनिटांनी म्हणजेच 2 वाजून 56 मिनिटं आणि 55 सेकंदानी एका महिलेचा घड्याळ बंद पडल्याचं दिसलं. हे पाहून सर्वच अचंबित झाले. उपस्थितांच्या मनात हे कसं घडलं असेल? हा प्रश्न उभा ठाकला. पण हा प्रश्न बाजूला ठेवून, बचावकार्य पार पाडण्यात आलं.
ज्या महिलेच्या हातावरील घड्याळ बंद पडलं, ती होती अंबरनाथची जानकी नाणेकर. याशिवाय अहमदनगर येथील सुष्मित मुथा, गुजरातच्या मोक्षा बाबूलाल शहा आणि मध्यप्रदेशमधील राणी गौर यांनी प्राण गमावले, तर अर्टीगा गाडीचा चालक बचावला.