Solapur Ward Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज सोलापूर महानगरपालिकेची मागील आरक्षण सोडत रद्द करून पुन्हा एकदा नव्याने आरक्षण सोडत पार पडली. सोलापूर महानगरपालिकेत एकूण 113 जागांवर निवडणूक होणार आहे. यापैकी 30 जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. तर अनुसूचित जातींसाठी 16 आणि अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव असणार आहेत.
अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागांसाठी आधीच आरक्षण निश्चित करण्यात आले होते. ते वगळून ओबीसी प्रवर्ग आणि महिलांसाठींच्या जागांचे आरक्षण सोडत पद्धतीने करण्यात आले. सोलापुरातल्या नियोजन भवन या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खराटे, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडतचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि सोलापुरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग (अंध) मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढत आरक्षण निश्चित करण्यात आले.
प्रभाग क्रमांक 1 ते 38 मध्ये ओबीसीसह आरक्षण पुढील प्रमाणे आहे.
प्रभाग 1
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी (महिला)
क - सर्वसाधारण (महिला)
प्रभाग 2
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग 3
अ - ओबीसी (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग 4
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग 5
अ - अनुसूचित जाती (महिला)
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण (महिला)
प्रभाग 6
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 7
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी - महिला
क - सर्वसाधारण - महिला
प्रभाग क्रमांक 8
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 9
अ - अनुसूचित जाती - महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण - महिला
प्रभाग क्रमांक 10
अ - मध्ये अनुसूचित जाती - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 11
अ - मध्ये ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 12
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 13
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 14
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 15
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 16
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 17
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 18
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 19
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 20
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 21
अ - अनुसुचित जाती
ब - ओबीसी - महिला
क - सर्वसाधारण - महिला
प्रभाग क्रमांक 22
अ - अनुसुचित जाती
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 23
अ - अनुसुचित जाती - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 24
अ - अनुसुचित जाती - महिला
ब - अनुसूचित जमाती
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 25
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 26
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 27
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 28
अ - अनुसूचित जाती - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 29
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 30
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 31
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 32
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 33
अ - सर्वसाधारण महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 34
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 35
अ - अनुसूचित जमाती - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 36
अ - अनुसूचित जाती - महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 37
अ - ओबीसी - महिला
ब - सर्वसाधारण - महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 38
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला