शिवसैनिकांच्या मनातून भाजपबद्दलचा राग अजून गेलेला नाही : संजय दिना पाटील
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2019 07:57 PM (IST)
शिवसैनिकांच्या मनातून भाजपबद्दलचा राग अद्याप गेलेला नाही, ईशान्य मुंबईत शिवसैनिक भाजपविरोधात मतदान करुन त्याचा बदला घेतील, सा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : शिवसैनिकांच्या मनातून भाजपबद्दलचा राग अद्याप गेलेला नाही, ईशान्य मुंबईत शिवसैनिक भाजपविरोधात मतदान करुन त्याचा बदला घेतील, असा विश्वास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ईशान्य मुंबई मतदार संघातील उमेदवार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केला आहे. पाटील म्हणाले की, काही लोक मला उघडपणे पाठिंबा देत आहेत, तर काही लोक छुप्या पद्धतीने मदत करत आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आशिर्वादाने मी खासदार होईन. VIDEO | राज ठाकरेंच्या सभांबाबत संजय निरुपमांना काय वाटतं? | मुंबई | एबीपी माझा ईशान्य मुंबईत आज मराठा युवा क्रांती आणि आगरी समाजाकडून संजय पाटलांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्यानंतर पाटलांनी विक्रो़ळी स्टेशन परिसरात जोरदार प्रचार केला. दरम्यान आज प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणांऐवजी 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा दिल्या जात होत्या.