जालना : जालन्यात पैशाच्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा भाजपच्या ओबीसी मोर्चाचा शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे. जालना शहरातील जिनिंग किल्ला भागात एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत आरोपी विजय मुंगसेला अटक केली. विजयने या हत्येची कबुली दिली आहे. आरोपी विजय मुंगसे आणि मयत कुमार झुंजूर हे मित्र होते. विजयने कुमारकडे 1 लाख 20 हजार रुपये ठेवण्यासाठी दिले होते. मात्र हे पैसे परत करण्यास कुमार टाळाटाळ करत होता. या कारणामुळे आपण कुमारची हत्या केल्याची कबुली आरोपी विजयने दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणी तपास करण्यात येत आहे.