मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या देशात सर्वसामान्य माणसांनी त्यांची ताकद काय असते हे दाखवून  दिलं आहे. सर्वसामान्य माणसांनी त्यांची तागद दाखवून दिली आहे. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी एका बोटाच्या आधारे आपण त्यांना रोखू शकतो, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं. इंडिया आघाडीनं सत्तास्थापनेवर  दावा केला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्या दुपारी जाणार आहे. बाहेरगावी असलेले खासदार उद्या सकाळी येथे येतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सकाळी संजय राऊत दिल्लीला जातील मी उद्या दुपारी दिल्ली जाणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


इंडिया आघाडी म्हणून आघाडी आम्ही तयार केली तेव्हा आमच्यापैकी कोणीही पंतप्रधानपदावर दावा केला नव्हता. उद्या सर्वांच्या मतानं इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बिहारमध्ये अजूनही मतमोजणी सुरु आहे, काही ठिकाणी छोटे घटकपक्ष आहेत त्यांना संपर्क सुरु आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 



चंद्राबाबू नायडू आणि इतरांशी काँग्रेसकडून इतरांकडून संपर्क सुरु आहेत. चंद्राबाबू नायडूंना भाजपनं काही कमी त्रास दिलेला नाही. भाजपच्या त्रासाला कंटाळलेली लोकं इंडिया आघाडीत येतील,असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यादिवशी आमची आघाडी झाली होती त्यावेळी ती संविधान वाचवण्यासाठी झाली होती. देशभक्त आमच्यासोबत येतील. चंद्राबाबू नायडू आमच्यासोबत येतील, असं  उद्धव ठाकरे म्हणाले. 


चंद्राबाबू नायडू आमच्यासोबत येतील...


छळवणुकीला सर्व लोक कंटाळली आहेत आणि चिडली आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सुडाच्या राजकारणाला कंटाळलेले देशभक्त एकत्र येतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझी आणि ममता बॅनर्जी यांची चर्चा झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महाराष्ट्रात 48 जागांवर आमचा विजय व्हावा, अशी अपेक्षा होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हाला अजून चार पाच जागांची अपेक्षा होती, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 


अमोल कीर्तिकर यांच्या जागेबाबत जो निर्णय होईल त्याला आव्हान होईल, उद्धव ठाकरे म्हणाले. कोकण आणि ठाण्याचा पराभव अनाकलनीय आणि क्लेषदायक आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. पंतप्रधान जिथं जिथं गेले तिथं  त्याचा आम्हाला फायदा झाला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


माझ्यावर जेवढ्या लोकांनी विश्वास ठेवला त्या सर्व लोकांचे आभार मानतो. पार्टी तोडली गेली, पक्ष चिन्ह हिसकावलं गेलं, मशालीवर आम्हाला निवडणूक लढावी लागली, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 


संबंधित बातम्या : 


रवींद्र वायकर 48 मतांनी जिंकले, आधी विजयी घोषित केलेले अमोल किर्तीकर हरले, सुपर ओव्हरला लाजवणारा थरार!


Loksabha Election 2024: झोळी घेऊन निघून जा, हेच जनमत; श्रीराम-बजरंगबली दोघांनीही मोदींना नाकारलं; संजय राऊतांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं