Kailas Patil : मराठवाडा (Marathwada) हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा बेल्ट आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे (Soybean) पीक घेतलं जातं. गेल्या काही दिवसात ढासळलेल्या सोयाबीनच्या भावाचा निवडणूक प्रचारात जोर धरतोय. धाराशीव विधानसभेचे महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाच उमेदवार कैलास पाटलांनी (Kailas Patil) सोयाबीन दरावरून भाजपवर खोचक टीका केली आहे. सोयाबीनची पेंड कोंबड्या खातात. त्यासाठी भाजपने ती आयात केली आहे. त्यामुळं सोयाबीनचे भाव ढासळले आहेत. भाजपाला शेतकऱ्यांपेक्षा कोंबड्या महत्त्वाच्या वाटतात, त्यांना मतदान का करावं? असा खोचक सवाल कैलास पाटील यांनी केला.


पोल्ट्री व्यवसायिकांच्या दबावातूनच शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव ढासळले आहेत, अशी टीका पाटील यांनी केली आहे. भाजपला शेतकऱ्यापेक्षा कोंबड्या महत्त्वाच्या वाटतात, मग शेतकऱ्यांनी त्यांना का मतदान करावं असा सवाल पाटील यांनी केला. पोल्ट्री व्यवसायिकांच्या दबावाला बळी पडून भाजपने सोयाबीनची पेंड आयात केली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव ढासळले ही टीका पाटील यांनी केली आहे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही सरकारने अनुदानाची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्ष अनुदान मिळालं नाही असेही पाटील म्हणाले. 


धाराशिव मतदारसंघात कोण मारणार बाजी? 


धाराशीव विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून कैलास पाटील हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. तसे सध्या धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गुजरातच्या रस्त्यावरून ते परत आले होते. एकनिष्ठ शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. कैलास पाटील यांना तिकीट मिळाल्याचं कन्फर्म झाल्यानंतर कैलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून 'कैलास पर्व' असे सोशल मीडियावर कॅम्पेनिंग करण्यात आले. कैलास पाटील हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून अजित पिंगळे (Ajit Pingle) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं धाराशीव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगला आहे. यामध्ये आता कैलास पाटील हे बाजी मारणार की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळे विजयी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यासाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप